Nilesh Sable  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nilesh Sable : निलेश साबळेचा नवाकोरा शो; लाडक्या वहिनींसाठी भन्नाट गिफ्ट, नावही आहे खास

Nilesh Sable New Project : निलेश साबळेच्या नवीन शोची घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्याने ही आनंदाची बातमी दिली आहे.

Shreya Maskar

निलेश साबळेला कॉमेडीचा किंग म्हणून ओळखले जाते.

निलेश साबळेचा नवीन शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

निलेश साबळेने सोशल मिडिया पोस्टर शेअर करून कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

'चला हवा येऊ द्या'मधून घराघरात पोहचलेला कॉमेडीचा किंग निलेश साबळेने (Nilesh Sable) प्रेक्षकांना मोठे सरप्राइज दिले आहे. निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या'मध्ये आपल्या कॉमेडी अंदाज आणि हटके सूत्रसंचालनाने प्रेक्षकांची मने जिंकली. आता पुन्हा एकदा तो नवीन शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्याचे पोस्टर त्याने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

निलेश साबळेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याचा स्माइल करणारा फोटो मध्यभागी दिसत आहे आणि पाठीमागे महिला वर्ग आनंदाने नाचताना दिसत आहे. निलेश साबळेच्या नवीन कोऱ्या शोचे नाव 'वहिनीसाहेब सुपरस्टार' असे आहे. पोस्टरला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "महाराष्ट्रातील तमाम आदरणीय वहिनींसाठी एक आगळा वेगळा शो…धमाल खेळ, गप्पा , कॉमेडी, संगीत , बक्षिसे आणि बरंच काही…!" निलेशचा नवीन शो त्याच्या लाडक्या वहिनींसाठी असणार आहे. पोस्टमध्ये संपर्क क्रमांक देखील सांगण्यात आला आहे.

निलेश साबळे 'वहिनीसाहेब सुपरस्टार' शोचे होस्टिंग करणार आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक आता या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहेत. अद्याप या शोची रिलीज डेट जाहीर झाली नाही. अलिकडे निलेश साबळे 'ढिंचॅक दिवाळी 2025' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या शोमध्ये भाऊ कदम देखील झळकला.

निलेश साबळे एक उत्तम अभिनेता, सूत्रसंचालक, दिग्दर्शक आणि लेखक आहे. 'कॉमेडी आणि बरंच काही', 'हसताय ना हसायलाचं पाहिजे', 'नवरा माझा भवरा' या शोमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता 2025 मध्ये 'चला हवा येऊ द्या'चे नवीन पर्व सुरू झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi Photos: स्पृहाचं तेजस्वी रूप, हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर 'पिट्या भाई' दुसरीकडेच फिरले; रमेश परदेशींचा भाजपमध्ये प्रवेश

Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य

कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

Delhi Blast: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अल-फलाहच्या संस्थापकाला अटक; दिल्ली बॉम्बस्फोटांनंतरची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT