Diwali 2025: या दिवाळी विकेंडला फॅमिलीसोबत पाहा 'हे' भन्नाट कॉमेडी चित्रपट

Shruti Vilas Kadam

फिर हेरा फेरी (2006)

हेरा फेरीचा सिक्वेल असलेला हा चित्रपट पहिल्याइतकाच मनोरंजक ठरला. बाबू भैय्यांच्या संवादांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या तिकडीने निर्माण केलेली हास्याची मैफिल प्रेक्षकांना नेहमीच आवडते

Diwali 2025

मुन्नाभाई एम.बी.बी.एस. (2003)

संजय दत्तचा मुन्नाभाई आणि अरशद वारसीचा सर्किट ही जोडी हास्य आणि भावना दोन्हींचं सुंदर मिश्रण आहे. ‘जादू की झप्पी’ने या चित्रपटाला वेगळं स्थान मिळवलं.

Diwali 2025

वेलकम (2007)

अक्षय कुमार, नाना पाटेकर, अनिल कपूर आणि परेश रावल यांनी सजवलेला हा चित्रपट म्हणजे हसवणुकीचा स्फोट. उदय शेट्टी आणि माजू भाई हे पात्रे आजही चाहत्यांची आवडती आहेत.

Diwali 2025

गोलमाल (2006)

रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल मालिकेने भारतीय कॉमेडीला नवा चेहरा दिला. चुकीची ओळख, भन्नाट पात्रं आणि अडचणीत पाडणारे प्रसंग यामुळे प्रत्येक भाग हास्याचा स्फोट ठरतो.

Diwali 2025

भूल भुलैया (2007)

अक्षय कुमार आणि राजपाल यादव यांच्या विनोदी अभिनयामुळे हा मनोवैज्ञानिक थ्रिलरही प्रेक्षकांना खळखळून हसवतो. कॉमेडी आणि रहस्य यांचा असा समतोल क्वचितच दिसतो.

Diwali 2025

पीके (2014)

आमिर खानचा पीके हा सामाजिक संदेश देणारा पण हलक्याफुलक्या विनोदात गुंफलेला चित्रपट आहे. धर्म, श्रद्धा आणि मानवी मूल्यांवर तो मजेशीर प्रश्न उपस्थित करतो.

Diwali 2025

दे दना दन (2009)

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल पुन्हा एकत्र आल्यावर काय घडतं हे या चित्रपटात दिसतं. हॉटेलमधील गोंधळ, चुकीची ओळख आणि अफलातून प्रसंग ही या चित्रपटाची मजा आहे.

Diwali 2025

Bhansali Box Office Hits: संजय लीला भन्साळींचे सर्वाधिक कमाई करणारे 7 चित्रपट; प्रियांका चोप्राचे 2 फिल्म आहेत यादीत

Bhansali Box Office Hits
येथे क्लिक करा