Nikki Tamboli Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli: बाई काय हा प्रकार...; निक्की तांबोळी अरबाज पटेलसमोर ढसाढसा रडली, नेमकं घडलं काय?

Nikki Tamboli: 'द 50' मध्ये निक्की तांबोळी आणि तिचा बॉयफ्रेंड अरबाज पटेलसमोर ढसाढसा रडतानाचा प्रोमो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे ती नेमकी का रडली हा प्रश्न व्हायरल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Nikki Tamboli: १ फेब्रुवारी रोजी जिओ हॉटस्टारवर 'द ५०'चा प्रीमियर झाला. प्रेक्षक आधीच या शोबद्दल उत्सुक होते. या सगळ्यामध्ये, एका नवीन प्रोमो व्हायरल होत आहे या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी अरबाज पटेलसमोर रडताना दिसत आहे. तर अरबाज तिचं सांतव्न करत आहे. निक्की ही बिनधास्त आणि सडेतोड उत्तर देणारी आहे. पण या शोच्या दुसऱ्याचं दिवशी ती रडल्याने नेटकरी थक्क आहेत. 'द ५०' मध्ये येण्यापूर्वी, निक्की तांबोळीने म्हटले होते की ती ती अरबाजसाठी येते. परंतु अरबाज पटेलचं वेगळं वागणं पाहून या गेममध्ये त्यांचे नाते कोणते वळण घेते हे पाहणे मनोरंजक असेल.

'द ५०' मध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात दुरावा आला का?

'द ५०' च्या प्रोमो व्हिडिओमध्ये, निक्की तांबोली तिच्या बॉयफ्रेंड अरबाज पटेलला म्हणते, "तू का समजत नाहीस? हे लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याची मला पर्वा नाही." त्यानंतर अरबाज तिला म्हणतो, "तुझा खेळ खेळ, पण हुशारीने खेळ." निक्की तांबोळी रडत रडत म्हणाली, "प्रत्येकजण फक्त एक खेळ खेळत आहे, पण आपण काय करत आहोत?" तिचा बॉयफ्रेंड उत्तर देतो, "कधीकधी तुला समजून घ्यावं लागते, यावेळी निक्की तांबोळी म्हणते, "मी कोणाच्याही पंखाखाली राहणार नाही."

'द ५०' शोला ट्रोल

द ५०' च्या या व्हिडिओमध्ये, अरबाज स्पष्ट करतो की हा जगण्याचा खेळ आहे आणि निक्कीला जगावे लागेल. निक्की तांबोली रडत रडत पडते. मग, 'द ५०' च्या सिंहाचा आवाज ऐकू येतो, "हे वेगळे आहे, नाही का?" या सर्वांमध्ये, 'द ५०' चा प्रोमो पाहिल्यानंतर, काही नेटकरी संतापलेले दिसतात.

एका युजरने म्हटले की मला हे सर्व पहायचे नाही, मी या शोसाठी खूप उत्साहित होतो पण या शो बिग बॉस बनवू नका. दुसऱ्या युजरने म्हटले की मी तुम्हाला सांगितले होते की हा पण शो बिग बॉस सारखाच. दुसऱ्या युजरने निक्की तांबोळीला फेक आहे. तर, एकाने लिहीले, जर खरचं या शोच्या दुसऱ्या दिवशी निक्की रडली तर हा शो बघितलाचं पाहिजे. अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यापूर्वी बिग बॉस मराठीमध्ये दिसले आहेत जिथून त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kids Sitting Posture: तुमची मुलंसुद्धा गुडघे वाकवून बसतात? वेळीच मोडा 'ही' सवय, डॉक्टरांनी दिली धोकादायक इशारा

Maharashtra Live News Update: रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची आज निवड

'अशोक खरातसारखा नीच माणूस, दोषींना ठेचून काढा; महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणावरून राज ठाकरे भडकले

Nora Fatehi: नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ; वर्क परमिट होणार रद्द, भारतातून केलं जाणार हद्दपार?

Single Chain Mangalsutra: ऑफिससाठी बेस्ट सिंगल चैन मंगळसूत्र, हे आहेत 5 लेटेस्ट पॅटर्न

SCROLL FOR NEXT