Nikki Tamboli Celebrity Masterchef  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli : बिग बॉस फेम निक्की तांबोळीने रागात सोडला 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शो? म्हणाली, 'गौरव खन्नाने आधी माफी...'

Nikki Tamboli Celebrity Masterchef : गौरव खन्नासोबत झालेल्या भांडणानंतर निक्की तांबोळी 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या सेटवरून निघून गेली आणि गौरवने माफी मागितली तरच या शोमध्ये येणार असं म्हणाली.

Shruti Vilas Kadam

Nikki Tamboli Celebrity Masterchef : मराठी बिग बॉसमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली निकी तांबोळी तिचा स्पष्ठ वक्तेपणा आणि बोल्ड लुकसाठी प्रसिद्ध आहे. गौरव खन्नासोबत झालेल्या भांडणानंतर निक्की तांबोळी अलीकडेच 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या सेटवरून बाहेर पडली. सोमवारी, शोच्या निर्मात्यांनी एक प्रोमो रिलीज केला यामध्ये निक्की रागावलेली आणि गौरवला माफी मागण्यास सांगताना दिसत होती. प्रोमोमध्ये निक्की रागाने शोमधून बाहेर पडताना दाखवण्यात आली. ती म्हणाली, 'हा अपमान आहे, मी इथून जाते.' तुम्हाला जे करायचे आहे ते करा, तो सॉरी म्हणेपर्यंत मी येणार नाही.

नंतर प्रोमोमध्ये, शोचे जज, शेफ रणवीर ब्रार निक्कीचे कौतुक करताना दिसले. रणवीर म्हणाला, जेव्हा तिला राग येतो तेव्हा ती स्वयंपाक करताना खूप लक्ष केंद्रित करते. निक्कीने असेही म्हटले की आजचा दिवस तिच्यासाठी खूप मस्त असेल किंवा सर्वात वाईट असेल.

निक्की तांबोळी आणि गौरव खन्ना यांच्यात वाद झाला.

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' वर निक्की तांबोळी आणि गौरव खन्ना अनेकदा एकमेकांशी भिडताना दिसतात. दोघांमध्ये अनेक वेळा जोरदार वाद झाले आहेत. शोच्या आधीच्या भागांमध्ये, निक्की गौरवला इनसिक्योर म्हणताना दिसून आली आहे. ती म्हणाली होती, 'मला वाटतं की हे इम्युनिटी पिनबद्दल नाहीये, गौरवने हे स्वीकारण्याची वेळ आली आहे की तू एक इनसिक्योर व्यक्ती आहेस.' यावर गौरव हसला.' नंतर, निक्की म्हणाली, 'मला वाटत नाही की कोणाकडेही हे तोंडावर सांगण्याची हिंमत आहे.'

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' कुठे पाहायचे

दरम्यान, 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'ची अंतिम फेरी जवळ आली आहे. फैसल शेखने स्वतःसाठी पांढरा एप्रन जिंकला आहे त्यामुळे तो थेट अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर इतर सर्व स्पर्धक सध्या काळे एप्रन घालत आहेत.'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा प्रीमियर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता सोनीलिव्हवर होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालाडमध्ये अग्नितांडव, १५ ते २० गाळ्यांना लागली आग

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

Cancer Signs: ७ लक्षणं दिसल्यास ९० दिवसांत डॉक्टरांकडे जा, कॅन्सर मूळापासून नष्ट होणार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! दोन परदेशी नागरिकांचा जागीच मृत्यू|VIDEO

'बहिणीवर बलात्कार अन् आईला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त', माजी मंत्र्यांवर बायकोचे खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT