Akshay Kumar: अक्षय कुमारने पुन्हा विकले मुंबईतील दोन घर; ८५% पेक्षा जास्त झाला फायदा, मिळाले कोट्यावधी रुपये

Akshay Kumar sells two flats: बॉलिवूड अभिनेता खिलाडी अक्षय कुमारने मुंबईतील बोरिवली येथील त्याचे आणखी दोन अपार्टमेंट ६.६ कोटी रुपयांना विकले आहेत.
akshay kumar
akshay kumarSaam Tv
Published On

Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता खिलाडी अक्षय कुमारने मुंबईतील बोरिवली येथील त्याचे आणखी दोन अपार्टमेंट ६.६ कोटी रुपयांना विकले आहेत. यापैकी एक अपार्टमेंट ५.३५ कोटी रुपयांना विकला गेला आहे. तर दुसरा अपार्टमेंट १.२५ कोटी रुपयांना विकला गेला. रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी स्क्वेअर यार्ड्सच्या मते, हे अपार्टमेंट ओबेरॉय स्काय सिटीमध्ये आहेत. दोन्ही घरांचे व्यवहार मार्च २०२५ मध्ये नोंदणीकृत झाले.

५.३५ कोटी रुपयांना विकलेला अपार्टमेंट

नोंदणी महानिरीक्षक (IGR) च्या वेबसाइटनुसार, ५.३५ कोटी रुपयांना विकले गेलेले अपार्टमेंट अक्षयने नोव्हेंबर २०१७ मध्ये २.८२ कोटी रुपयांना खरेदी केला होता. यामुळे त्याला एकूण ८९ टक्क्यांचा फायदा झाला आहे. या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया १००.३४ चौरस मीटर (१,०८० चौरस फूट) आहे. यावर ३२.१ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क आकारले गेले.

akshay kumar
Kunal Kamra Controversy: कॉलेज ड्रॉपआऊट ते स्टॅण्डअप कॉमेडियन...; महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांवर टीका करणारा कुणाल कामरा कोण?

अक्षयने त्याचा दुसरा अपार्टमेंट १.२५ कोटी रुपयांना विकला. २०१७ मध्ये ६७.१९ लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. त्याला एकूण ८६ टक्क्यांचा फायदा झाला आहे. या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया २३.४५ चौरस मीटर (२५२ चौरस फूट) आहे. या व्यवहारावर ७.५ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले.

akshay kumar
Emraan Hashmi Awarapan 2: इमरान हाश्मीच्या वाढदिवशी 'आवारापन २' ची घोषणा; टीझर प्रदर्शित करत चाहत्यांना दिलं सरप्राईज

दोन्ही अपार्टमेंट कुठे होते?

ओबेरॉय स्काय सिटी २५ एकरमध्ये पसरलेले आहे. हे अपार्टमेंट ओबेरॉय रिअ‍ॅलिटीमध्ये आहेत. यामध्ये ३ बीएचके, ३ बीएचके+स्टुडिओ आणि डुप्लेक्स अपार्टमेंट्ससारखे रेडी-टू-मूव्ह-इन घर उपलब्ध आहेत. मे २०२४ मध्ये बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनीही ओबेरॉय स्काय सिटीमध्ये अनेक मालमत्ता खरेदी केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com