Arbaaz-Nikki  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Arbaaz-Nikki : बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यावर निक्की - अरबाजचा स्पेशल टूर प्लान, 'या' सुंदर ठिकाणाला देणार भेट

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस' चा खेळ चांगलाच रंगताना दिसत आहे. घराबाहेर पडल्यावर अरबाजने निक्की सोबतचे आपले प्लान सांगितले आहेत.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र बिग बॉस (Bigg Boss Marathi) मराठीची चर्चा पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण गेममध्ये बाजी मारण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. लवकरच बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. हा शो यंदा फक्त 70 दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या आठवड्यात घरातून अरबाज पटेलला बाहेर जावे लागले. त्याच्या जाण्याने निक्कीला खूप वाईट वाटले. ती खूप रडली.

बिग बॉस मराठीचं यंदाच पर्व निक्की (Nikki Tamboli) आणि अरबाजने (Arbaz Patel ) गाजवलं आहे. त्यांच्या मैत्री रोज घरात नव्याने दिसत होती. अरबाजने एका मिडिया मुलाखतीत त्यांच्या फिरण्याच्या प्लान बद्दल सांगितले. अरबाज निक्कीला घेऊन छत्रपती संभाजीनगरला जाणार असल्याचे त्याने सांगितले.

अरबाज आणि निक्की दोघ सुद्धा छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar ) आहेत. निक्कीचं संपूर्ण बालपण संभाजीनगरला गेल आहे. तर अरबाजचं शिक्षण संभाजीनगरला झाल आहे. एका मिडिया मुलाखतीत अरबाजने सांगितले की, "मी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा झालो आहे. तसेच देवगिरी कॉलेजमध्ये शिकलो आहे. तर निक्की सुद्धा छत्रपती संभाजीनगरची आहे हे तिने मला सांगितले होते. तर मग आता मी तिला घेऊन छत्रपती संभाजीनगरला जाणार असल्याचे अरबाजने सांगितले." पुढे तो म्हणाला की, "ती जिथे लहानपणी जिथे गेली होती तिथे मी तिला घेऊन जाणार आहे. बिग बॉस फिनालेनंतर आम्ही दोघंही छत्रपती संभाजीनगरला फिरताना तुम्हाला नक्कीच दिसू." असा अरबाज म्हणाला.

अरबाजने या मुलाखतीत त्याचे आणि निक्कीचे अनेक प्लान सांगितले आहे. त्या दोघांना एकत्र काम करायचे आहे. तसेच तो म्हणाला, "आम्ही एकत्र म्युझिक अल्बम मध्ये ही दिसू" असे सांगितले. बिग बॉस मराठी 5 हे पर्व अरबाज-निक्कीची जोडीने गाजवले. या संपूर्ण प्रवासात ते दोघे कायम एकत्र होते. त्यांच्यात भांडण देखील झाली पण ते दोघेही नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहीले आहेत. आता अरबाज गेल्यावर निक्की कसा गेम खेळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. तसेच अरबाजने निक्कीनेच ट्रॉफी जिंकावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT