Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate Trolled Facebook
मनोरंजन बातम्या

Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate Trolled: “आधी गाडी नीट चालवा अन् मग…”, ‘त्या’ व्हिडीओमुळे ट्रोलर्सने घेतली मुग्धा-प्रथमेशची शाळा, नेमकं काय घडलं?

Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate Video: सध्या सोशल मीडियावर प्रथमेश आणि मुग्धा एका रिलमुळे चर्चेत आले आहेत. त्यामुळे त्यांना चाहत्यांनी प्रचंड ट्रोल ही केलं आहे.

Chetan Bodke

Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate Video Viral

सारेगम लिटल चॅम्पमधील टॉप ५ मधल्या स्पर्धकांची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. सोशल मीडियावर नेहमीच प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन त्यांच्या गाण्यांमुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनने सोशल मीडियावर ते दोघेही रिलेशनमध्ये असल्याची माहिती दिली होती. सोशल मीडियावर चाहत्यांसोबत कायमच अनेक रिल्स ते शेअर करत असतात. सध्या एका रिलमुळे प्रथमेश आणि मुग्धा चर्चेत आले आहेत.

अनेकदा त्यांनी एकत्र येत काही गाण्याचे कार्यक्रमही केले आहेत. नुकतंच प्रथमेश आणि मुग्धाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रथमेश आणि मुग्धा दोघेही कारने प्रवास करीत आहेत. त्या प्रवासा दरम्यान त्यांनी एक रिल शुट केला होता. या रिलमध्ये प्रथमेश आणि मुग्धा हे दोघेही ‘ओ रंगरेज’ हे गाणं गाताना दिसत आहे. पण नेटकऱ्यांना ते गाडी चालवताना व्हिडीओ शुट करित आहेत, ही बाब काहीशी पटलेली दिसत नाही. त्यांनी चालत्या गाडीमध्ये हा व्हिडीओ शूट केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्या दोघांनाही प्रचंड ट्रोल केलं आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ मुग्धा वैश्यंपायनने तिच्या फेसबुक रिलवरुन शेअर केला आहे. हा रिल शेअर करताना मुग्धाने ‘#CarjammingswithPrathameshMugdha डूबना है बस तेरा बन के हाय नहीं रहना दूजा बन के’ आणि पुढे प्रथमेश लघाटेला टॅग केलं आहे. मुग्धा कार ड्रायव्हिंग करीत असून तिच्या बाजुला प्रथमेश बसलेला दिसतोय. अनेकदा ते दोघेही एकत्र प्रवास करताना दिसतात. आपल्या दमदार आवाजामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य केलेल्या जोडीने प्रवासात केलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांना पटलेला नाही. यावेळी नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून चांगलीच शाळा घेतली. (Social Media)

अनेकांनी मुग्धाला आणि प्रथमेशला ड्रायव्हिंग करताना व्हिडीओ शुट न करण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी चांगलंच झापलं सुद्धा आहे. एक जण म्हणतो, ‘आधी गाडी नीट चालवा, एका ठिकाणी थांबून व्हिडीओ तयार करा, चालता गाडीमध्ये असे प्रयोग करु नका...’ तर आणखी एक जण म्हणतो, ‘जे काय करायचं ते गाडी थांबवून करा. नाहीतर ड्राइवर घ्या आणि तुम्ही मस्त लाइव्ह करा. लोकांचं प्रेम आहे तुमच्यावर. त्याची जबाबदारी पण स्वीकारा.’ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT