Bigg Boss 18: बिग बॉसचा १८चा सीझन अखेर संपला आहे. शोच्या भव्य प्रीमियरसह, करण वीर मेहरा विजेता झाला आहे. करण वीरने ट्रॉफी जिंकली, तर विवियन डिसेना हा पहिला रनरअप ठरला. करण आणि विवियनसह, रजत दलाला, अविनाश मिश्रा, चुम दरंग आणि ईशा सिंग यांनी टॉप ६ मध्ये स्थान मिळवले. शेवटपर्यंत लोकांना प्रश्न पडला होता की या सिझनमध्ये कोण जिंकणार. करणने या सिझनची ट्रॉफी घरी नेली आहे. पण, लोकांना हा निर्णय चुकीचा वाटत असून लोक त्यांचा राग सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.
सोशल मिडीयावर काही नेटकरी करणवीर मेहराच्या विजयावर संताप व्यक्त करत आहेत. या नेटकऱ्यांना वाटते की हा सिझन रजत दलाल किंवा विवियन डिसेना यांनी जिंकायला हवा होता. करणच्या विजयानंतर तो बिग बॉसवर असनेक टीका करत आहेत.
एका नेटकऱ्यांने लिहिले- तुम्ही थेट ट्रॉफी द्यायला हवी होती, वोटिंग घेण्याची काय गरज होती. तरीही, बिग बॉसच्या सुरुवातीपासूनच रजत आणि विवियन टॉप २ मध्ये जाणार होते. एका वापरकर्त्याने लिहिले- बिग बॉस हा एक ठरवलेला शो आहे, रिअॅलिटी शो नाही.
एका वापरकर्त्याने लिहिले- मला वाटते की अविनाश त्याच्यापेक्षा खूप चांगला होता. तो नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला आहे. एकाने लिहिले- रजत आणि विवियनसाठी सर्व काही ठरवले गेले होते, पण करण जिंकला. करण वीर मेहरा बिग बॉस ट्रॉफीसह ५० लाख रुपयांची मोठी रक्कम जिंकला आहे. या निकालामुळे अनेक चाहते नाराज आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.