Neha Kakkar Divorce: बॉलिवुडची फेमस गायिका नेहा कक्करने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केले की ती काम आणि नात्यांपासून ब्रेक घेत आहे. परंतु काही वेळाने तिने ती पोस्ट डिलीट केली. त्यानंतर नेहाने आणखी एक पोस्ट पोस्ट केली. यामध्ये तिने पती रोहनप्रीत सिंगसोबत तिचा घटस्फोट होणार असल्याच्या अफवांना उत्तर दिले.
काय आहे पूपा प्रकरण?
गायिका नेहा कक्करने तिचा पती रोहनप्रीत सिंगपासून घटस्फोटाच्या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे. सोमवारी नेहाने सोशल मीडियावर पोस्ट केले की ती जबाबदाऱ्या, नाती आणि कामापासून ब्रेक घेत आहे मी परत येईल की नाही हे तिला माहित नाही. तसेच तिने पापाराझी आणि चाहत्यांना तिचे फोटो किंवा व्हिडिओ न घेण्याची आणि तिच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती देखील केली. तेव्हा तीचा घटस्फोट होणार असल्याच्या अफवांना सुरुवात झाली. पण, तिने काही मिनिटांतच पोस्ट डिलीट केली.यामुळे सोशल मीडियावर घटस्फोटाच्या अफवांना अणखी उधाण आले.
नेहाची पोस्ट
नाते आणि कामापासून ब्रेक घेतण्याबद्दल पोस्ट केल्यानंतर, नेहाने काही तासांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आणखी एक पोस्ट शेअर केली. नेहाने लिहिले, "मित्रांनो, कृपया माझ्या गोड आणि निष्पाप पतीला आणि माझ्या सुंदर कुटुंबाला या सगळ्यात ओढू नका. हे सगळे माझ्या आयुष्यातील सर्वात प्रामाणिक लोक आहेत. मी आज जे काही आहे ते त्यांच्या पाठिंब्यामुळे आहे." नेहाने पुढे लिहिले की काही लोकांबद्दल आणि सिस्टिमबद्दल मी नाराश आहे. यामध्ये कृपया तिच्या पतीला आणि कुटुंबाला त्यात आणू नका.
नेहाला पोस्टबद्दल पश्चात्ताप आहे
नेहाने कबूल केले की सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट करणे चूक होती कारण लोक छोट्या छोट्या गोष्टींना ट्रोल करतात. तिने असेही लिहिले की ती पुन्हा कधीही सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणार नाही. शेवटी, नेहाने लिहिले, बिचारी, इमोशनल नेहा या जगासाठी खूप इमोशनल आहे. माफ करा आणि धन्यवाद. काळजी करू नका, मी लवकरच धमाकेदार कमबॅक करेन खूप खूप प्रेम.