Neha Kakkar Bollywood Journey Instagram @nehakakkar
मनोरंजन बातम्या

HBD Neha Kakkar: भजनं गाणाऱ्या नेहा कक्करची कशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री ?

Neha Kakkar Bollywood Journey : ४ वर्षाची असताना नेहा देवीचे जागरण करणारे भजन जायची.

Pooja Dange

Neha Kakkar Superhit Song : सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा आज वाढदिवस आहे. ६ जून, १९८८ ला नेहाचा जन्म झाला. नेहा ३५ वर्षाची झाली आहे. नेहाने तिच्या आवाजाने लाखो मने जिंकली आहेत. ४ वर्षाची असताना नेहा देवीचे जागरण करणारे भजन जायची. तिने तिचे करियरची सुरुवात 'इंडियन आयडल'पासून केली. ऋषिकेश येथे जन्मलेल्या नेहाच्या वाढदिवशी नजर टाकूया तिचे बेस्ट गाण्यांवर.

जागरण ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास

नेहा तिच्या वडिलांसोबत जागरणमध्ये भजन गाायची, तिथे तिला 500 रुपये मिळायचे. त्यानंतर तिने 'इंडियन आयडॉल 2' मध्ये भाग घेतला, परंतु ती शोमधून एलिमिनेट झाली.

मात्र, नेहाने हार मानली नाही आणि 2008 मध्ये मीट ब्रदर्सने संगीतबद्ध केलेला 'नेहा-द रॉकस्टार' हा अल्बम लाँच केला. नेहाने 'मीराबाई नॉट आऊट'मध्ये कोरस सिंगिंगद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि त्यानंतर 'सेकंड हँड जवानी', 'सनी सनी'सह अनेक गाणी गायली. (Latest Entertainment News)

लंडन ठुमकडा

2014 मध्ये कंगना रनौतचा 'क्वीन' चित्रपट खूप गाजला होता आणि त्यातील गाण्यांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटातील 'लंडन ठुमकडा' हे गाणे आजही प्रत्येक लग्नात आणि पार्टीत वाजते. हे गाणे नेहाने तिची बहीण सोनू कक्कर आणि लाभ जंजुआ यांच्यासोबत गायले आहे, ज्याचे लोकांनी कौतुक केले आहे.

कर गाई चूल

2016 मध्ये रिलीज झालेला 'कपूर अॅण्ड सन्स' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाल दाखवू शकला नाही, मात्र त्यातील गाणी लोकांना आवडली होती.

चित्रपटातील 'कर गई चुल' हे गाणे सुपरहिट ठरले, जे आजही पार्टीत ऐकायला मिळते. या चित्रपटात आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि फवाद खान मुख्य भूमिकेत दिसले होते. या गाण्यात नेहासोबत बादशाह, फाजिल पुरिया आणि सुकृती कक्कर यांनी गायले आहे.

काला चष्मा

2016 मध्ये, सिद्धार्थ आणि कतरिना कैफचा 'बार बार देखो' चित्रपट प्रदर्शित झाला होता आला. या चित्रपटातील 'काला चष्मा' गाणे देखील फेमस झाले. हे रिमिक्स गाणे अनेक पार्टीजमध्ये आजही वाहते. नेहासह अमर अर्शी आणि रॅपर बादशाह यांनी हे गाणे गायले आहे.

आंख मारे

नेहाने 2018 च्या रणवीर सिंग आणि सारा अली खान स्टारर 'सिम्बा' मधील 'आंख मारे' हे गाणे गायले आहे. चित्रपट निर्माता करण जोहरही या गाण्यात दिसला होता. हे गाणे 1996 मध्ये आलेल्या 'तेरे मेरे सपने' या चित्रपटातील 'आंख मारे' या गाण्याचे रिमेक व्हर्जन होते, ज्याला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता.

मिका सिंग आणि कुमार सानू यांनीही या गाण्याला आवाज दिला असून तनिष्क बागचीने ते रिक्रिएट केले आहे.

दिलबर

जॉन अब्राहमच्या 2019 मध्ये आलेल्या 'सत्यमेव जयते' चित्रपटातील 'दिलबर' हे गाणे नोरा फतेहीसोबत रिक्रिएट करण्यात आले. हे गाणे नेहा, इक्का सिंग आणि ध्वनी भानुशाली यांनी गायले आहे. नोराच्या या गाण्यावर अप्रतिम डान्स केला आहे. लोकांनी या गाण्याला भरभरून प्रेम दिले आणि नेहाच्या सर्वोत्कृष्ट गाण्याच्या यादीत त्याचा समावेश झाला.

या सुप्रसिद्ध गाण्यांद्वारे नेहा बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरली आहे. नेहाने पंजाबी गायक रोशनप्रीत सिंगसोबत लग्न केले. दोघेही एकमेकांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT