Katrina Kaif Impress Vicky Kaushal कतरिनाने विकीला इम्प्रेस करण्यासाठी गायलं पंजाबी गाणं; गाणे ऐकताच अभिनेत्याने डोक्यालाच हात लावला

Katrina Kaif and Vicky Kaushal: कतरिना आणि विकी नेहमीच एकमेकांसाठी हटके काहीतरी करताना दिसत असतात.
Katrina Kaif Sing Punjabi Song For Vicky Kaushal
Katrina Kaif Sing Punjabi Song For Vicky KaushalInstagram @katrinakaif

Katrina Kaif Sing Punjabi Song For Vicky Kaushal : कतरिना कैफ आणि विकी कौशल सुप्रसिद्ध बॉलिवूड कपल आहे. विकी आणि कतरिना दोघही नेहमीच चर्चेत असतात. दोघंही एकमेकांसाठी काहीतरी स्पेशल करत असतात. दरम्यान विकीला इम्प्रेस करण्यासाठी कतरिनाने पंजाबी गाणं गायल्याचं अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

विकी - साराच 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटप्रेमी आणि या दोन्ही कलाकारांचे फॅन्स थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही सारा - विकी चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. विकीने चित्रपटाच्या प्रोमोशनदरम्यान कतरिनाचा एक किस्सा शेअर केला. कतरिनाने विकीसाठी पंजाबी गाणं गायल्याचं त्याने सांगितलं आहे. (Latest Entertainment News)

Katrina Kaif Sing Punjabi Song For Vicky Kaushal
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor : शेवटी जात आडवी आलीच, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्यानं शेअर केला धक्कदायक अनुभव

कतरिना आणि विकी नेहमीच एकमेकांसाठी हटके काहीतरी करताना दिसत असतात. मग ते विकीने कतरिनासाठी केलेला डान्स असो, एखादं सेलिब्रेशन असो. प्रत्येक वेळी त्यांनी ते दोघ बेस्ट कपल असल्याच दाखवून दिलं आहे. विकी किती पंजाबी आहे हे तो त्याच्या वागण्या-बोलण्यातून नेहमीच दाखवून देत असतो. त्याच्याकडून नेहमीच पंजाबी वाइब्स येत असतात.

कतरिनाने गायलं विकीसाठी खास पंजाबी गाणं

विकी - कतरिना एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत होते. त्यांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. एक क्युट कपल म्हणून त्यांना ओळखले जाते. हे सेलिब्रेटी हे कपल सर्वांनाच खूप आवडतं. त्यांचे एकमेकांसोबतचे फोटा किंवा एकमेकांसाठी कौतुकाची पोस्ट हे नेहमीच चाहत्यांना आवडतात.

विकीने चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कतरिनाचा एक किस्सा शेअर केला. कतरिनाने त्याच्यासाठी एक पंजाबी गाण गायलं होतं. तो म्हणाला की, कतरिनाने जे गाण गायल तिला वाटलं ते रोमान्टीक गाणं आहे. पण त्या गाण्याचा अर्थ 'जर तू माझ्या विरोधात गेलास तर मी तुला गोळी मारेन असा होता.' यावर तो म्हणाला की, "हे तु माझ्यासमोर गायल, मी ते रोमान्टीक मानून घेतलं पण प्लीज दुसऱ्या कोणासमोर हे गाण गाऊ नको."

कतरिना पंजाबी शिकतेय

विकीला कतरिना पंजाबी बोलते का असं देखील यावेळी विचारण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला की, 'ती थोडं थोडं पंजाबी बोलते. तिला विचारल ना 'की हाल चाल?' तर ती म्हणते, 'वढिया है.' तिला थोड थोड पंजाबी येत.'

विकीच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटासाठी कतरिनाने सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com