Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor : शेवटी जात आडवी आलीच, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्यानं शेअर केला धक्कदायक अनुभव

Prithvik Pratap: पृथ्विकने तो त्याच्या नावापुढे आडनाव का लावत नाही, हे सांगितले आहे.
Maharashtrachi HasyaJatra
Maharashtrachi HasyaJatra Instagram @im_gaurav_more20

Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor Spoke About Casteism : महाराष्ट्राची हास्यजत्रा ही अत्यंत लोकप्रिय विनोदी मालिका आहे. या मालिकेप्रमाणेच या मालिकेतील कलाकार देखील लोकप्रिय झाले आहेत. या मालिकेतील अभिनेता पृथ्विक प्रताप देखील त्याच्या विविध पात्रांमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे.

पृथ्विक प्रतापने एका मुलाखतीत जातीमुळे आलेला त्याचा अनुभव सांगितला आहे. पृथ्विकने तो त्याच्या नावापुढे आडनाव का लावत नाही, हे सांगितले आहे. एका मुलाखतीत त्याला त्याचे आडनावावविषयी विचारण्यात आलं.

यावर अभिनेताला पृथ्विक प्रताप म्हणाला, मला आजवर पाच मुलींनी जातीमुळे नाकारलं आहे. जेव्हा आपण कुलकर्णी, शिंदे, पाटील अशी आडनावं सांगतो तेव्हा त्यावरून लगेचच आपल्याला जज केलं जातं की तुम्ही कोणत्या जातीचे आहात. मी लहानपणापासून हे पाहिलं आहे. माझ्या जवळचे अनेक मित्र यातून गेले आहेत. पण हा त्रास मला सहन होत नाही.' (Latest Entertainment News)

Maharashtrachi HasyaJatra
HBD Madhavi Bhabhi : 'तारक मेहता का उलटा चश्मा'मुळे माधवी भाभीचं आयुष्यच बदललं; सोनालिकाचा मालिकेतील १५ वर्षाचा प्रवास

'आडनाव पाहून एका विशिष्ट चौकटीत तुम्हाला अडकवलं जातं. मला माझ्या जातीबद्दल कमीपणा वाटतो असं मुळीच नाही. प्रत्येकाला आपल्या जातीचा आदर असतोच. पण आडनाव काढून टाकलं तर तुम्ही त्या व्यक्तीला माणूस म्हणून ट्रीट करता.'

पृथ्विक प्रताप पुढे म्हणाला, 'आपल्याला फक्त नावावरूनच का ओळखले जाऊ नये. आडनाव सांगितलं की लगेचच तुम्ही त्याची जात शोधायला लागता. माझे पाच ब्रेकअप तर याच कारणामुळे झालेले आहेत.

तिघी जणींनी तर मला जातीवरून रिजेक्ट केलं. तर चौथी जी माझी गर्लफ्रेंड होती. तिचे आईबाबा आजही माझ्याशी तेवढ्याच आपुलकीने बोलतात, मला त्यांच्या घरी बोलावतात, खाऊ घालतात. सगळं काही छान होतं पण नंतर तिने माझ्या कामावर, माझ्या पगारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.'

'नकार द्यायचा म्हणून ती वेगवेगळी कारणं शोधत होती. पण मग शेवटी तिने आपली जात एक नाही म्हणून नकार दिला. खरंतर अगोदर याच कारणामुळे मला तिघींनी नकार दिला होता हिने केवळ डायरेक्टर नकार न देता गोष्ट फिरवण्याचा प्रयत्न केला.'

'प्रत्येक जातीला तिचा सन्मान मिळायला हवा, त्यावरून त्याचं अस्तीव ठरवण्याचा कुणालाही अधिकार नाही. मी 'कांबळे' नसतो 'कुलकर्णी' असतो तरीही मी माझं आडनाव लावलं नसतं. प्रत्येक माणसाला फक्त त्याच्या नावावरून माणूस म्हणून ओळखलं जावं एवढीच माझी इच्छा आहे.' अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रमाने दोन महिने ब्रेक घेतला आहे. त्याऐवजी कोण होणार करोडपती या कार्यक्रम दाखविण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com