कपूर कुटुंबातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नीतू कपूर. आज नीतू कपूर यांचा ६६ वा वाढदिवस आहे. नीतू कपूर यांनी वयाच्या ८व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांची फिल्मी लव्हस्टोरी नेहमीच सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे. आज नीतू यांच्या वाढदिवसानिमित्त भांडणापासून सुरू झालेली लव्हस्टोरी लग्नापर्यंत कशी आली, हे जाणून घेणार आहोत.
८ जुलै १९५८ रोजी जन्मलेल्या नीतू यांनी 'बेबी सोनिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. 'बेबी सोनिया' चित्रपटामध्ये, काम केलं त्यावेळी त्या ८ वर्षांच्या होत्या. नीतू लहान असतानाच वडिलांचं छत्र हरपलं. त्यामुळे बालपणापासूनच घराची जबाबदारी त्यांच्यावर होती. वयाच्या १९ व्या वर्षी नीतू यांनी राजेंद्र कुमार आणि वैजयंतीमाला यांच्या 'सुरज' चित्रपटातून आपल्या करियरची सुरूवात केली. खरंतर नीतू आणि ऋषी कपूर यांची पहिली भेट 'जहरीलाल इन्सान' चित्रपटाच्या माध्यमातून झाली होती. शुटिंगवेळी ते दोघेही चांगले मित्र झाले. त्यावेळी नीतू कपूर १५ वर्षांच्या होत्या, तर ऋषी कपूर २१ वर्षांचे होते. पण त्यावेळी ऋषी कपूर यांचं दुसऱ्या मुलीसोबत रिलेशन सुरू होतं.
खरंतर, ऋषी कपूर आणि नीतू सिंह दोघेही खूप चांगले फ्रेंड्स असल्यामुळे त्यांची सेटवर अनेकदा भांडणंही व्हायचे. ऋषी सेटवर नीतू यांना खूप त्रास द्यायचे. या भांडणातूनच त्यांच्यातील मैत्री अधिकच घट्ट झाली. ऋषी आणि नीतू यांची मैत्री खूप चांगली असल्यामुळे अनेकदा त्या ऋषी यांना मुलींना इम्प्रेस करण्यासाठी मदत करायच्या. नीतू ऋषी यांच्या वतीने त्यांच्या गर्लफ्रेंडना पत्र लिहायच्या. पण कालांतराने ऋषी यांचे त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाला. त्याच दरम्यान नीतू आणि ऋषी यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊ लागले होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, एकत्रित काम केले. त्यांची जोडी सुपरडुपर हिट ठरली.
नीतू आणि ऋषी यांनाही आपलं प्रेम मिळवण्यासाठी खूपच तारेवरची कसरत करायला लागली होती. नीतू सिंह यांची आई राझी सिंह यांना ऋषी कपूर यांच्याबद्दल कळल्यानंतर त्यांनी अभिनेत्रीवर बंधनं घालण्यास सुरूवात केली. नीतू आणि ऋषी यांच्या लव्हस्टोरीला नीतू यांची आई राजी सिंह यांचा खूप नकार होता. ऋषी कपूर यांच्यासोबतचे रिलेशन नीतू यांच्या घरातल्यांना पसंद नव्हते. नीतू जेव्हाही ऋषीसोबत डेटला जायचे तेव्हा त्यांची आई तिच्या चुलत बहिणीला सोबत पाठवायचे. अभिनेत्रीचा चुलत भाऊ प्रत्येक डेटला नीतू आणि ऋषीसोबत यायचा, पण दोघेही त्याला कुठल्यातरी बहाण्याने एकटे सोडून पळून जायचे. त्याच काळात नीतू सिंह करियरच्या शिखरावर होत्या. शेवटी नीतू यांच्या आईने लेकीला आणि ऋषी यांच्या नात्याला होकार दिला.