दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आज तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. नयनताराने तिच्या सिनेसृष्टीतील कारकीर्दमध्ये अनेक आव्हानात्मक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रोफेशनलसह पर्सनल लाईफमुळे नयनतारा कायमच लक्ष वेधून घेताना दिसली. अशातच आज वाढदिवसानिमित्त नयनताराची लव्हलाईफ जाणून घेऊया.
नयनताराचा जन्म १८ नोव्हेंबर १९८४मध्ये ख्रिश्चन कुटुंबात झाला आहे. तिचे वडील एअरफोर्समध्ये अधिकारी होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नयनतारा अभिनय क्षेत्रात वळली. अशातच नयनतारा आता टॉपची अभिनेत्री बनली आहे. प्रभूदेवा आणि नयनतारा यांचे एकमेकांवर प्रेम होते. प्रभू देवाच्या प्रेमात नयनतारा आकंठ बुडाली होती. त्याला तीन मुले असतानाही नयनताराला प्रभूदेवासोबत लग्न करायचे होते. यानंतर दोघेही एकत्र राहू लागले. याचदरम्यान नयनताराने धर्मही बदलला होता. नयनतारा मूळ ख्रिश्चन होती मात्र प्रभूसाठी तिने हिंदू धर्म स्वीकारला. मात्र नंतर या दोघाचंही बिनसलं यानंतर
यानतंर २०१५ मध्ये नयनतारा आणि विघ्नेशची भेट झाली. एकत्र काम करताना हे कपल प्रेमात पडले. त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करु लागले. या जोडप्याने 6 वर्षे डेटिंग केल्यानंतर 25 मार्च 2021 रोजी साखरपुडा केला होता.यानंतर 9 जून 2022 रोजी चित्रपट दोघांनीही लग्न केले. अनेक सेलिब्रिटी मंडळी या दोघांच्या लग्नाला उपस्थिती होते. या जोडप्याला उर रुद्रोनिल एन शिवन आणि उलग धैवाग एन शिवन अशी जुळी मुलं आहेत.
नयनताराच्या कामाबद्दल बोलायचे तर, नयनतारा ही सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह नयनाताराने बॉलिवूडमध्ये तिचं अनोखं स्थान निर्माण केलं आहे. 2023 मध्ये शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. तिच्या 'नयनतारा - बियॉन्ड द फेयरीटेल' या माहितीपटामुळे सध्या चर्चेत आहे. 'नयनतारा - बियॉन्ड द फेयरीटेल' नयनताराच्या आयुष्यावर आधारित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.