Nawazuddin siddiqui On salman khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui: 'सिकंदर'च्या अपयशासाठी केवळ भाईजान जबाबदार...; नवाजुद्दीन सिद्दीकी स्पष्टच बोलला...

Nawazuddin siddiqui On salman khan: बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Shruti Kadam

Nawazuddin siddiqui support salman khan: बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने स्पष्टपणे सांगितले की, या अपयशासाठी केवळ सलमान खानला दोष देणे योग्य नाही, कारण चित्रपट बनवणे ही एक सामूहिक प्रक्रिया आहे. नवाजुद्दीनने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "भाईजानने जर एखाद्या चित्रपटासाठी होकार दिला, तर तो चित्रपट मोठा होण्याची शक्यता वाढते. पण जर दिग्दर्शक आणि निर्माते स्क्रिप्टवर योग्य प्रकारे काम केले नाही, तर संपूर्ण दोष सुपरस्टारवर टाकणे चुकीचे आहे."

'सिकंदर' चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतीक बब्बर आणि सत्यराज यांसारखे कलाकार होते. चित्रपटाने पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई केली, परंतु एकूण कमाई 184.6 कोटींवरच थांबली, जी सलमान खानच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत कमी आहे. चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना आवडले नसल्याने चित्रपट चालला नसल्याचे बोलले जाते.

नवाजुद्दीन सिद्दीकीने सलमान खानसोबत 'बजरंगी भाईजान' आणि 'किक' या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने सलमान खानच्या कामाबद्दल सांगितले की, "सलमान एक फाराख-दिल (उदार मनाचा) अभिनेता आहे. 'बजरंगी भाईजान'च्या शूटिंगदरम्यान तो मला स्वतःचे संवाद देऊन म्हणायचा, 'तू बोल हे डायलॉग' आणि त्यातून शिकून तो काम करायचा. तो प्रत्येकासाठी असाच आहे."

'सिकंदर'च्या अपयशानंतर सलमान खानने आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले असून, त्याने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ते व्यायाम करताना दिसतात. अहवालानुसार, सलमान खान लवकरच संजय दत्तसोबत एका नव्या चित्रपटावर काम सुरू करणार आहेत. या नव्या प्रकल्पामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

बीडमध्ये राडा! कोयता, लोखंडी रॉड अन् दगडानं ४ जणांना ठेचलं; रस्त्यावर रक्तच.. कारण फक्त | Beed Crime

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT