Nawazuddin Siddiqui canva
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui: अफेअरच्या चर्चेवर नवाजुद्दीन भडकला "कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात....

Nawazuddin Siddiqui on Viral Video: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. खोट्या अफेअरच्या चर्चेवर नवाजुद्दीनने संताप व्यक्त केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या जबरदस्त अभिनय आणि कॉमेडीमुळे नेहमीचं चर्चेत असतो. नवाजुद्दीनने त्याच्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर चाहात्यांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्याने त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये सुरुवात गँग्स ऑफ वसेपूर, मॅक माफिया, बजरंगी भाईजान, सेक्रेड गेम्स,मांझी-द माउंटन मॅन यासारख्या हिट चित्रपटात जबरदस्त अभिनय केलाय. नवाजुद्दीन त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते.

जेव्हा नवाजुद्दीनच्या पत्नीने त्याच्यावर केले त्याचं दरम्यान तो एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला होता. त्यानंतर चाहत्यांमध्ये अभिनेत्याच्या अफेअरची चर्चा सुरू झाली.या चर्चांना नवाजुद्दीनने विरामचिन्ह दिलाय. एका मुलाखाती दरम्यान त्याने चाहत्यांच्या सर्व प्रश्नांचे उत्तर दिलं आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकताच झालेल्या एका मुलाखाती दरम्यान अभिनेत्याला ती मिस्ट्री गर्ल जिच्यासोबत फोटोज व्हायरल होत आहेत की कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने उत्तर देतांना म्हटलं की, " कोणी तर चुकीची बातमी पसरवली आहे.कोणत्याही मुलीची अशी बदनामी करू नका.लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला आवडतं.परंतु यामुळे कोणाचं नुकसान होत, असेल तर त्यागोष्टी योग्य नव्हे. मला या सगळ्या गोष्टीवर हसू येत नाही तर राग येतो आणि मनाला दु:ख होतं."

काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन विमानतळावर दिसला होता.त्यावेळी त्याच्यासोबत एक मुलगी दिसली होती. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. व्हिडिओमुळे त्या मुलीला आणि अभिनेत्याला नेटकऱ्याकडून ट्रोल करण्यात आलं होतं.व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सर्वत्र नवाजुद्दीनच्या आणि त्या मुलीच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या होत्या.

Edited By: Nirmiti Rasal.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपची जाहीर सभा

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT