Nawazuddin Siddiqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनच्या घरातला वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; सासूने सुनेविरोधात पोलिसात दाखल केली एफआयआर

नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांनी नवाजुद्दीनची पत्नी जैनाबविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

Chetan Bodke

Nawazuddin Siddiqui News: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी नेहमी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. तो अनेकदा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांनी नवाजुद्दीनची पत्नी जैनाबविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

एफआयआर दाखल झाल्यानंतर नवजुद्दीनची पत्नी जैनाबला वर्सोवा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. जैनाबचा नवाजुद्दीनच्या आईसोबत वाद झाल्याचा आरोप आहे, जो आता पोलिस स्थानकापर्यंत पोहोचला आहे. वर्सोवा पोलिसांनी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईच्या तक्रारीनंतर एफआयआरच्या आधारे जैनाबला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले आहे.

अभिनेत्याची पत्नी जैनाब विरुद्ध कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीनची आई आणि त्याच्या पत्नीमध्ये मालमत्तेवरून वाद झाला होता, त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आली होती. जैनाब उर्फ ​​आलिया ही नवाजुद्दीनची दुसरी पत्नी आहे.

2010 मध्ये दोघांचे लग्न झाले होते. नुकतेच, लॉकडाऊन दरम्यान दोघींमध्ये वाद झाल्याच्या बातम्याही माध्यमांवर प्रसारित करण्यात आल्या होत्या. दोघींनीही एकमेकींवर अनेक गंभीर आरोप केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यादरम्यान अभिनेत्याच्या पत्नीनेही नवाजुद्दीनच्या कुटुंबियांवर मारहाणीचा आरोप केला होता.

FIR

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वैयक्तिक आयुष्यात जरी अडचणी येत असल्या तरीही नवाजुद्दीन बॉलिवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक आहे. तो कोणत्याही चित्रपटात काम करतो, तो आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयावर खोलवर छाप सोडतो. नवाजुद्दीन लवकरच हड्डी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटातील अनेक पोस्टर्स समोर आले आहेत. ट्रान्सजेंडर लूकमधील नवाजुद्दीनला ओळखणे देखील कठीण झाले होते. टिकली, बांगड्या आणि कानातले झुमक्यांमध्ये नवाजुद्दीन खुपच सुंदर दिसुन येत होता. हड्डीतील नवाजुद्दीनचा लूक सतत चर्चेत असतो. अक्षत अजय शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट जुलैमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुंभमेळ्याच्या आखाड्यात शिवसेना शिंदे गटाचीही उडी

Thane Tourism : गोव्याहून सुंदर ठाण्यातील 'हा' समुद्रकिनारा, एकदा गेलात तर परत यावं वाटणार नाही

Pune News: १०० फूट उंच तेजस्वी प्रतिकृती! पुण्यातील दगडूशेठ मंडळाकडून यंदा केरळच्या मंदिराचा देखावा|VIDEO

EPFO खाते असणाऱ्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये मिळणार? पण कसे? जाणून घ्या...

Monday Horoscope : स्पर्धात्मक वातावरणात प्रगती होईल, ५ राशींना मिळेल यश; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT