Kartik Aaryan Movie: अक्षय कुमारच्या सिक्वलमध्ये कार्तिक आर्यनच का? खुद्द कार्तिकने सांगितले कारण...

कार्तिकने अक्षय कुमारच्या चित्रपटांच्या सिक्वेलमध्ये काम करण्याबाबत खुलासा केला.
Kartik Aaryan On Akshay Kumar Movie Sequels
Kartik Aaryan On Akshay Kumar Movie Sequels Saam Tv

Kartik Aaryan On Akshay Kumar Movie Sequels: बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या बॅक टू बॅक हिट्स चित्रपट देत आहे. कार्तिक आर्यनच्या हिट चित्रपटामुळे तो बॉलीवूडमधील एक यशस्वी अभिनेता ठरला आहे. अनेक चित्रपट निर्मात्यांनी त्याला पसंती दर्शवली आहे. कार्तिक आर्यन विशेषतः अक्षय कुमारच्या चित्रपटांसाठी योग्य असल्याचे मानला जात आहे. गेल्या वर्षी, कार्तिकने अक्षय कुमारच्या भूल भुलैया 2, भूल भुलैयाचा सिक्वेल केला होता. जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

आता कार्तिक अक्षय कुमारच्या आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपट 'हेरा फेरी'च्या सिक्वेलमध्ये काम करणार आहे. रजत शर्मा यांचा लोकप्रिय शो 'आप की अदालत' मध्ये कार्तिक त्याच्या आगामी चित्रपट शहजादाच्या प्रमोशनसाठी उपस्थित राहिला होता. त्यावेळी त्याने अक्षय कुमारच्या चित्रपटांच्या सिक्वेलमध्ये काम करण्याबाबत खुलासा केला.

Kartik Aaryan On Akshay Kumar Movie Sequels
'Sa Re Ga Ma Pa L'il Champs 9': नऊ वर्षाच्या चिमुकलीने 'सारेगमप लिटील चॅम्प्स'चा विजेतीचा पटकावला मान...

रजत शर्मा यांच्या लोकप्रिय शो आप की अदालतमध्ये कार्तिकला विचारण्यात आले की, "तो सुपरस्टार अक्षय कुमारच्या मागे का लागला आहे? आणि त्याच्या हेरा फेरी आणि हाऊसफुल या चित्रपटांचे सिक्वेल का करायचे आहे?" यावर कार्तिक म्हणाला, “मला ते करायचे नाही सर, मला अनेक वेळा या चित्रपटांची ऑफर आली आहे. निर्माते-दिग्दर्शकांना वाटते की, सिक्वेलची जबाबदारी माझ्या खांद्यावर ठेवता येईल. त्यांना माहित आहे की, मी किती प्रोफेशनल आहे, मी त्यात किती इन्व्हॉल्व होऊन काम करतो."

कार्तिक पुढे म्हणाला, ''असे नाही की सगळे सिक्वेल चालतात. सिक्वेलमध्ये खूप दडपण येते. पण मला माहीत नाही हे काय समीकरण आहे ...कदाचित त्यांनी (निर्मात्यांनी) माझे काम पाहिले असेल. त्यांना माहित आहे की मी कदाचित त्यात फिट होईल, मग ती भूमिका कोणताही प्रकार असो, मग तो रोमान्स, हॉरर किंवा कॉमेडी असो."

कार्तिकचा आगामी चित्रपट 'शहजादा' असणार आहे. यामध्ये कार्तिक क्रिती सेनन सोबत दिसणार आहे. रोहित धवन दिग्दर्शित 'शेहजादा'मध्ये कार्तिक आणि क्रिती व्यतिरिक्त मनीषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय, सचिन खेडेकर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. भूषण कुमार, अल्लू अरविंद, अमन गिल आणि कार्तिक आर्यन निर्मित शहजादा 10 फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय सत्यप्रेम की कथा, आशिकी ३, कॅप्टन इंडिया हे कार्तिकचे आगामी चित्रपट आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com