'Sa Re Ga Ma Pa L'il Champs 9': नऊ वर्षाच्या चिमुकलीने 'सारेगमप लिटील चॅम्प्स'चा विजेतीचा पटकावला मान...

Jetshen Dohna Lama Is The Winner: जेटशेन डोहना लामा ठरली 'सारेगमप लिटील चॅम्प्स 9'ची विजेती.
'Sa Re Ga Ma Pa L'il Champs' Season 9 winner
'Sa Re Ga Ma Pa L'il Champs' Season 9 winnerSaam Tv

'Sa Re Ga Ma Pa L'il Champs' Season 9 Winner: 'सारेगामापा लिटिल चॅम्प ९' या रिऍलिटी शोचा काल अंतिम सोहळा पार पडला आहे. जेटशेन डोहना लामा ही या शोची विजेती ठरली आहे. या पर्वाचे परीक्षण शंकर महादेवन, अनु मलिक आणि नीती मोहन यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक छोटे शूरवीर घडले. भरती सिंह या कार्यक्रमाची सूत्रसंचालक होती.

'सारेगामापा लिटिल चॅम्प' हा टीव्हीवरील एक प्रसिद्ध शो आहे. गेले तीन महिने या शो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. जेटशेन लामाने हा शो जिंकून मिळवला आहे. हर्ष सिकंदर आणि ज्ञानेश्वरी घाडगे पहिले आणि दुसरे उपविजेते ठरले आहते.

'Sa Re Ga Ma Pa L'il Champs' Season 9 winner
Pathan Controversy : पठान चित्रपटाचं भलंमोठं पोस्टर उतरवलं; पुण्यात बजरंग दल आक्रमक

'सारेगामापा लिटिल चॅम्प ९' चा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. काही सादरीकरणे इतकी सुंदर होती की डोळ्यातून पाणी आले. हर्ष सिकंदर, रफा यासमीन, अथर्व बक्षी, अतनू मिश्रा, जेटशेन लामा आणि ज्ञानेश्वरी घाडगे या सहा फायनलिस्टच्या धमाकेदार सादरीकरणाने या सोहळ्याची सुरूवात झाली. यामुळे सर्वच मंत्रमुग्ध झाले. शंकर महादेवन, अनु मलिक आणि नीती मोहन हा स्पर्धकांचे सादरीकरण पाहून भारावून गेले.

बॉलीवूड सुपरस्टार जॅकी श्रॉफ, चित्रपट निर्माता अनुराग कश्यप आणि संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदी हे दिग्गज देखील या सोहळ्याला उपस्थित होते. ज्यांचे किस्से ऐकून प्रेक्षक खळखळून हसले. जॅकी श्रॉफने मंजीर वाजवली, तर हर्ष या स्पर्धकाने भक्ती गीत गायले. जेटशेनचे सादरीकरण आवडल्याने अमित त्रिवेदी थेट मंचावर आला आणि त्याने तिला 'परेशान' गाणे गाण्याची विनंती केली.

विजेत्या जेटशेन लामाने तिच्या भावना व्यक्त करत म्हटले की, 'माझे स्वप्न पूर्ण झाले, ही स्पर्धा खूप कठीण होती. कारण या पर्वातील सर्वच स्पर्धक खूपच टॅलेंटेड होते. मी खरंच स्वतःला धन्य समजते की मला या सर्वांसोबत गाण्याची संधी मिळाली. 'सारेगामापा लिटिल चॅम्प ९' या प्रवासात मला खूप काही शिकायला मिळाले. मी सर्व परीक्षकांची देखील आभारी आहे. ज्यांनी नेहमीच मला सहकार्य केले. एक गायक म्हणून त्यांनी मला माझी गुणवत्ता ओळखण्यास मदत केली. मी इथून खूप आठवणी घेऊन जात आहे. आता मी माझ्या नवीन प्रवासाच्या प्रतीक्षेत आहे.'

जेटशेन लामाला विजेती झाल्यानंतर 'सारेगामापा लिटिल चॅम्प ९'ची ट्रॉफी आणि १० लाख रुपये देण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com