Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : सुप्रिया, स्वप्निल अन् अशोक मामांनी घेतला बिग बॉसच्या घरात हॉल्ट, पाहा VIDEO

Navra Maza Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा 2' चे कलाकार आज बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालणार आहेत. घरातील सदस्यांसोबत ते कोणता गेम खेळणार जाणून घ्या.

Shreya Maskar

आज बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi) घरात 'नवरा माझा नवसाचा 2' (Navra Maza Navsacha 2) चे कलाकार येणार आहेत. बिग बॉसच्या घरात आज धमाल कल्ला पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता. की घरात 'नवरा माझा नवसाचा 2' स्वप्नील जोशी, सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) आणि आपल्या सर्वांचे लाडके अशोक मामा (Ashok Saraf) आलेले पाहायला मिळत आहे. त्यांना पाहून बिग बॉसच्या घरातल्यांना खूप आनंद होतो. ते सर्व मिळून कालाकारांचे स्वागत करतात.

तब्बल २० वर्षांनी 'नवरा माझा नवसाचा २' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली आहे.

बिग बॉसच्या घरात आज धमाल, मस्ती सोबतच भरपूर डान्स आणि खेळ खेळायला मिळणार आहेत. 'डमरूच्या तालावर बाप्पा नाचे' या गाण्यावर घरातील सर्व मंडळी ठेका धरतात आणि मनसोक्त नाचू लागतात. घरात स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) सदस्यांसोबत 'स्वाद खुळा' हा खेळ खेळताना दिसत आहे. यामध्ये घरातील सदस्यांच्या डोळ्याला पट्टी बांधून पदार्थ चाखायला देऊन त्याचे नाव ओळखायला सांगत आहेत.

या आठवड्यात हाताच्या हाताच्या दुखापतीमुळे संग्राम चौगुले याला बिग बॉस घराच निरोप घ्यावा लागला. आज या घरातून कोण बाहेर जाणार की सर्व सुरक्षित राहणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT