71st National Film Awards: भारतीय कलाकारांसाठी सर्वात प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे. यावेळी मराठी चित्रपटांचा दबदबा दिसून आला असून या वेळी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या श्यामची आई या चित्रपटाला मराठी चित्रपट विभागातून सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजय डहाके यांनी केले असून या चित्रपटात ओम भुतकरने साने गुरुजींची भूमिका साकारली होती.
तर ३ दशकानंतर पहिल्यांदाच शाहरुख खानला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. 'जवान' चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. आणखी कोणाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे? येथे जाणून घ्या.
विजेत्यांची यादी वाचा:
सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री- गॉड वल्चर अँड ह्युमन
सर्वोत्कृष्ट कल्चर फिल्म- टाइमलेस तमिळनाडू
सर्वोत्कृष्ट तेलुगू फिल्म- भागावान्थ केसरी
सर्वोत्कृष्ट तमिळ फिल्म- पार्किंग
सर्वोत्कृष्ट पंजाबी फिल्म- गॉडडे गॉडडे चा
सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- शामची आई
सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- कठल
सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमा- वश
सर्वोत्कृष्ट बंगाली सिनेमा- डीप फ्रीजर
सर्वोत्कृष्ट अॅक्शन सिनेमा- हनूमान
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी- वैभवी मर्चंट (रॉकी और रानी की प्रेम कहाणी)
सर्वोत्कृष्ट म्यूझिक दिग्दर्शक- हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल सिनेमा)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन- अॅनिमल
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- प्रसन्नता मोहपात्रा (द केरला स्टोरी)
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फिमेल- शिल्पा राव
सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार- कबीर कंढरे (जिप्सी), त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकले आणि भार्गव
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- उर्वशी, जानकी बोडीवाला
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी (‘मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे’)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान, जवान आणि विक्रांत मेसी, 12th फेल
सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा- नाळ २
सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दिग्दर्शक- आशीष बेंडे (आत्मपॅम्फलेट)
सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म- 12th फेल
'श्यामची आई' या चित्रपटात ओम भूतकरसह अभिनेत्री गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,सारंग साठ्ये, संदीप पाठक, ज्योती चांदेकर, उर्मिला जगताप, अक्षया गुरव, दिशा काटकर, मयूर मोरे, गंधार जोशी, अनिकेत सागवेकर यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.