Saiyaara Box Office Collection Day 14: यशराजच्या बॅनरखाली बनलेला 'सैयारा' हा चित्रपट मोहित सुरी यांनी दिग्दर्शित केला असून चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मोहित सुरीचा 'सैयारा' हा चित्रपट १८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या रोमँटिक चित्रपटाद्वारे अहान पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात अहानसोबत अभिनेत्री अनिता पड्डा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली आहे. दरम्यान, 'सैयारा'च्या १४ व्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहेत. तर मग गुरुवारी चित्रपटाने किती कोटींची कमाई केली ते पाहूया.
'सैयारा'ने कबीर सिंगला मागे टाकले
'सैयारा' प्रेक्षकांना खूप आवडला आहे. चित्रपटात अहान पांडेसोबत अनिता पड्डा यांची जोडीने प्रेक्षकांची मने पूर्णपणे जिंकली आहे. नवीन स्टार्सच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र सुरु आहे. 'सैयारा'ला समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'सैयारा' सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत १९ व्या क्रमांकावर आला आहे. यापूर्वी कबीर सिंग १९ व्या क्रमांकावर होता. आता 'सैयारा'ने शाहिद कपूरच्या चित्रपटालाही मागे टाकले असून २०१९ मध्ये आलेल्या शाहिदच्या 'कबीर सिंग'ने जगभरात ३७७ कोटी आणि भारतात २८०.५० कोटींचा व्यवसाय केला होता. मात्र, सॅकनिल्कच्या मते, आता 'सैयारा'ने हा विक्रम मोडला आहे.
१४ व्या दिवशी इतके कोटी कमवले
'सैयारा'ने पहिल्या दिवशी २१ कोटींची मोठी कमाई केली. आता गुरुवारचे कलेक्शन समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, १४ व्या दिवशी 'सैयारा'ने ६.५० कोटी रुपये कमावले आहेत. तर, आतापर्यंत एकूण २८०.५० कोटी रुपये कलेक्शन झाले आहे.
'सैयारा'चा टोटल कलेक्शन
दिवस १- २१.५ कोटी रुपये
दिवस २-२६ कोटी रुपये
दिवस ३- ३५.७५ कोटी रुपये
दिवस ४- २४ कोटी रुपये
दिवस ५- २५ कोटी रुपये
दिवस ६- २१.५ कोटी रुपये
दिवस ७- १९ कोटी रुपये
दिवस ८- १८ कोटी रुपये
दिवस ९- २६.५ कोटी रुपये
दिवस १०- ३० कोटी रुपये
दिवस ११- ९.२५ कोटी रुपये
दिवस १२- १० कोटी रुपये
दिवस १३- ७.५ कोटी रुपये
दिवस १४- ६.५० कोटी रुपये
एकूण कलेक्शन - २८०.५० कोटी रुपये