Alia Bhatt Kriti Sanon And Allu Arjun Saam Tv
मनोरंजन बातम्या

National Film Awards 2023: आलिया भट्ट, क्रिती सेनन आणि अल्लू अर्जुनला आज मिळणार नॅशनल फिल्म अवॉर्ड, पाहा विजेत्यांची लिस्ट

Alia Bhatt Kriti Sanon And Allu Arjun: आलिया भट्ट (alia bhatt), क्रिती सेनॉन (kriti sanon) आणि अल्लू अर्जुन (allu arjan) यासारख्या स्टार्सची नावे विजेत्या यादीत आहेत.

Priya More

National Film Awards 2023 Winner List:

69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (National Film Awards 2023) आज दिल्लीत होणार आहे. 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आज त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. आलिया भट्ट (alia bhatt), क्रिती सेनॉन (kriti sanon) आणि अल्लू अर्जुन (allu arjan) यासारख्या स्टार्सची नावे विजेत्या यादीत आहेत.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि क्रिती सॅननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अभिनेता अल्लू अर्जुनला 'पुष्पा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेत्री आलिया भट्ट, अल्लू अर्जुन हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. आलिया भट्ट पती रणबीर कपूरसोबत विमानतळावर दिसली.

दिल्लीतल्या विज्ञान भवनमध्ये दुपारी दीड वाजता हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. हा पुरस्कार सोहळा डीडी नॅशनलवर थेट पाहता येईल. भारतातील प्रसिद्ध राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची सुरुवात 1954 साली झाली. हा पुरस्कार सोहळा भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून आयोजित केला जातो.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठीच्या विजेत्यांची यादी -

- सर्वोत्कृष्ट अभिनेता: अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)

- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी)

- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: क्रिती सॅनन (मिमी)

- सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: रोक्ट्रेरी: द नंबी इफेक्ट (आर माधवन मुख्य भूमिकेत)

- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- निखिल महाजन (गोदावरी-द होली वॉटर)

- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)

- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: पंकज त्रिपाठी (मिमी)

- सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर- सरदार उधम सिंग

- सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर- सरदार उधम सिंग

- सर्वोत्कृष्ट छायांकन- सरदार उधम सिंग

- सर्वोत्कृष्ट संपादन- गंगुबाई काठियावाडी

- सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट- गंगुबाई काठियावाडी

- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- सरदार उधम सिंग

- सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट-चेल्लो शो

- सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट- होम

- सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट- काडैसी विवसयी (Kadaisi Vivasayi)

- सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट - समांतर

- सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट- उपेना (Uppena)

- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - एकदा काय झालं

- सर्वोत्कृष्ट बाल कलाकार - भावीन रबारी (चेल्लो शो)

- सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट- 777 चार्ली

- विशेष ज्युरी पुरस्कार- शेरशाह

- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- पुष्पा

- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - आरआरआर

- सर्वोत्कृष्ट कृती दिग्दर्शन पुरस्कार- RRR (स्टंट कोरिओग्राफर- किंग सॉलोमन)

- सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- RRR (कोरियोग्राफर- प्रेम रक्षित)

- सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- आरआरआर (स्पेशल इफेक्ट्स क्रिएटर- व्ही श्रीनिवास मोहन)

- सर्वोत्कृष्ट नॅरेशन व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट- कुलदा कुमार भट्टाचार्जी

- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- इशान दिवेचा

- सर्वोत्कृष्ट संपादन- अभ्रो बॅनर्जी (If Memory Serves Me Right) नॉन फीचर फिल्म

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

SCROLL FOR NEXT