Bigg Boss 17 Update: 'हे लोकं तोंडावर किती चांगला वागतात', 'बिग बॉस 17'च्या घरात पाहिलं नॉमिनेशन झाल्यानंतर मनारा चोप्रा झाली इमोशनल

Bigg Boss 17: 'बिग बॉस 17' घरातील पहिले नॉमिनेशन पार पडले आहे.
Bigg Boss 17 1st Nomination
Bigg Boss 17 1st NominationSaam TV
Published On

Bigg Boss 17 First Nomination:

सलमान खान होस्ट करत असलेल्या टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस १७' ला सुरुवात झाली आहे. रविवारी १५ ऑक्टोबरला या शोचा ग्रँड प्रीमियर पार पडला.

'बिग बॉस १७'मध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांसह विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. या पर्वात एकूण १७ स्पर्धक आहेत. 'बिग बॉस' सुरू होताच घरात वादांना सुरुवात झाली आहे. दरम्यान घरातील पहिले नॉमिनेशन देखील पार पडले आहे.

'बिग बॉस १७'चा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये 'बिग बॉस' घरातील स्पर्धकांना अशा एका व्यक्तीचे नाव घ्यायला सांगतात जो 'बिग बॉस'च्या कास्टिंगमध्ये बसत नाही.

या व्हायरल प्रोमोमध्ये ऐश्वर्या, विकी, ईशा, नील आणि घरातील इतर स्पर्धक मनाराचे नाव घेतात आणि तिला नॉमिनेट करतात. स्पर्धकांच्या या निर्णयाने मनाराला धक्का बसतो आणि ती इमोशनल होत रडू लागते. (Celebrity)

Bigg Boss 17 1st Nomination
Smita Patil Birthday: फक्त १० वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये मिळवला 'पद्मश्री' पुरस्कार, स्मिता पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास

या व्हिडीओमध्ये मनारा तेहलका भाईला सांगते की, 'ज्या ज्या लोकांनी मला नॉमिनेट केले आहे ते माझ्याशी खूप चांगले वागतात. मला विकीने माझं नाव घेतला याचा जास्त धक्का बसला, 'तो दुतोंडी आहे.' 'हे सगळे लोक माझ्या तोंडावर माझ्याशी खूप चांगलं वागतात आणि आता मला यांनी नॉमिनेट केलं. हे सगळं मला विकीकडून अपेक्षित नव्हतं. तो माझ्याशी किती चांगला वागतो.'

'बिग बॉस १७' सुरू झाल्यानंतर एक महत्त्वाची घोषणा 'बिग बॉस'नी केली. त्यांनी मी बायस्ट (पक्षपात) असणार असल्याचे सांगितले. 'बिग बॉस'नी सगळ्या स्पर्धकांना एकत्र बोलावले आणि अंकिता, नील, ऐश्वर्या, रिंकू यांची नावं घेतलं म्हटलं की उद्या बाकीचे म्हणतील मी या लोकांना पाठीशी घालतो. पण मी यावेळी बायस्टच असणार आहे. जो शोच्या कामी येईल मी त्याला सपोर्ट करेन. जो या शोच्या कामी येणार नाही तो माझ्यासाठी या घरात असून नसल्यासारखे असेल. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com