Girija Oak SAAM TV
मनोरंजन बातम्या

Girija Oak : 'नॅशनल क्रश'कडे ४०० हून अधिक साड्या; किंमत वाचून पायाखालची जमीन सरकेल

Girija Oak Saree Collection : 'नॅशनल क्रश' गिरिजा ओकने अलिकडेच आपल्या साड्यांचे सुंदर कलेक्शन दाखवले आहे. ज्याची किंमत लाख रुपयांची आहे. साड्यांविषयी गिरिजा नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक आता 'नॅशनल क्रश' बनवली आहे.

गिरिजाने आपल्या सुंदर साड्यांचे कलेक्शन दाखवले आहे.

गिरिजाकडे 400 हून अधिक साड्या आहेत. ज्यांची किंमत लाख रुपये आहे.

मराठमोळी अभिनेत्री रातोरात 'नॅशनल क्रश' बनली. लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ती 'नॅशनल क्रश' बनली. निळ्या रंगीची साडी आणि आकर्षक पांढऱ्या ब्लाउजमधील गिरिजा ओक एक फोटो नुकताच व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये चाहत्यांनी तिच्या सुंदर, पारंपारिक शैलीचे कौतुक केले आहे.

'नॅशनल क्रश' गिरीजा ओकने नुकतेच हॉटरफ्लायशी (Hauterrfly) संवाद साधला. तेव्हा गिरीजाने आपल्या साडी प्रेमाबद्दल मोठी खुलासा केला. तिने सांगितले की, तिच्याकडे 400 पेक्षा अधिक साड्या आहेत. गिरीजाने तिच्या आवडत्या साड्या दाखवल्या. ज्यात तिच्या आई आणि आजींकडून वारशाने मिळालेल्या साड्यांचा समावेश आहे. तिने सांगितले की, माझ्याकडे संपूर्ण भारतातील साड्या आहेत. मी खरेदी केल्या आहेत. मी बहुतेकदा थेट विणकरांकडून किंवा कारागिरांकडून थेट साड्या खरेदी करते.

गिरीजाने 1960-70 च्या दशकातील आजीची जुनी साडी दाखवली. जी हाताने रंगवलेली शिफॉन साडी होती. या साडीतून जुन्या काळातील सुंदरता दिसून येते, असे ती म्हणाली. त्यानंतर गिरीजाने तिच्या वॉर्डरोबमधील सर्वात महागडी साडी दाखवली. जी कच्च्या आंब्यापासून बनवलेली बनारसी जमावार आहे. साडीचे कौतुक करत ती म्हणाली, "ही माझी आवडती साडी आहे. थोडी महाग आहे. किडनीच्या किंमती एवढी साडीची किंमत आहे. लाख रुपयांची किंमत आहे. माझ्याकडे फक्त एक कच्च्या आंब्याची साडी आहे, मी त्याहून अधिक साड्या घेऊ शकत नाही. पण ती खूप सुंदर रंगाची आहे."

साड्या दीर्घकालीन चांगल्या ठेवण्यावर ती गिरीजा म्हणाली, "जर तुम्ही साड्या चांगल्या प्रकारे ठेवल्या तर त्यांचे आयुष्य कायमचे असते. साडी कोणत्याही आकारात बसू शकते, ती खूप बहुमुखी आहे." गिरीजाने तिच्या साडीचे कलेक्शन दाखवले. ज्यात वेगवेगळ्या साड्या पाहायला मिळाल्या. यात लेहेरिया साड्या, ब्लॉक-प्रिंटेड डिझाइन, कलमकारी ड्रेप्स आणि एक क्लासिक महाराष्ट्रीयन पैठणी, जॉर्जेट लेहेरिया साडी यांचा समावेश आहे.

"ही जॉर्जेट लेहेरिया साडी आहे, जी एका लहान बॉक्समध्ये आली होती. मी ती गुजरातमधून खरेदी केली" असे तिने सांगितले. स्वतः ब्लॉक-प्रिंट केलेली साडी देखील दाखवली. तिच्या साडी कलेक्शमधील ऑड्रे हेपबर्न-प्रिंट साडीने लक्ष वेधून घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार, खासदार, नगरसेवक त्यांचेच आणि चापट मारून तुम्हाला मतदान करायला सांगतील, जैन मुनींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: किल्ले रायगडावर व्यावसायिक अतिक्रमण ?

धुळ्यात अवैध देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; झोपड्यांवरही बुलडोझर फिरवला

Loan Tips: पहिल्यांदा लोन घेत असताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?

Weather Update : पुढील ४८ तास महत्त्वाचे! ऐन हिवाळ्यात मुसळधार पाऊस कोसळणार, कोणत्या राज्यांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT