Girija Oak SAAM TV
मनोरंजन बातम्या

Girija Oak : 'नॅशनल क्रश' बाजारात भाजी विकत घेताना दिसली, VIDEOनं वेधलं लक्ष

Girija Oak Vegetables Buying Video : 'नॅशनल क्रश' गिरिजा ओक सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती भाजी खरेदी करताना दिसत आहे.

Shreya Maskar

मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक रातोरात 'नॅशनल क्रश' बनली.

गिरिजाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

पोस्टमध्ये गिरिजा भाजी खरेदी करताना दिसत आहे.

मराठमोळी अभिनेत्री रातोरात 'नॅशनल क्रश' बनली. लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ती 'नॅशनल क्रश' बनली. यामागे तिची अनेक वर्षांची मेहनत आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. गिरिजाने मराठी आणि हिंदीमध्ये काम केले आहे. तिने आजवर मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. अशात आता गिरिजाने एक पोस्ट केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गिरिजा बाजारात भाजी खरेदी करताना दिसत आहे.

गिरिजा ओक पोस्ट

गिरिजाने पोस्टमध्ये 2 फोटो आणि 1 व्हिडीओ शेअर केला आहे. पहिल्या फोटोत ती क्यूट स्माइल देताना दिसत आहे. असे वाटत आहे. जेवून तिचे मन तृप्त झाले आहे. तर दुसऱ्या फोटोत पंचपक्वानाचे ताट दिसत आहे. यात भात, डाळ, भाजी, अळूवडी आणि दोन चटण्या पाहायला मिळत आहे. तर व्हिडीओमध्ये गिरिजा बाजारात भाजी खरेदी करताना दिसत आहे. सिंपल घरातील कपडे घालून ती भाजी खरेदी करायला गेली आहे. चांगली भाजी निवडताना ती दिसत आहे. तसेच तिच्या हातात पिशव्या देखील आहेत. गिरिजाने या पोस्टला खूपच खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "घर का खाना..."

गिरिजा ओक उत्कृष्ट अभिनेत्रीसोबत सुगरण देखील आहे. कामाच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून ती घरी स्वयंपाक करते. आपल्या हेल्थकडे विशेष लक्ष देते आणि हेल्दी जेवण करते. तिचा हा साधाभोळा स्वभाव प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. गिरिजाचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गिरिजा ओकने शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटात काम केले आहे.

चाहत्यांच्या कमेंट्स

गिरिजा ओकच्या या व्हिडीओवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत. तिचा साधा स्वभाव आणि निखळ सौंदर्याचे चाहते दिवाने झाले आहेत. गिरिजाच्या पोस्टवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव होत आहे. "नॅशनल क्रश अपडेट", "क्यूट", "पारंपारिक भारतीय जेवण", "लव्ह यू" अशा कमेंट्स येत आहेत. तसेच एक युजर विचारतो की, "नॅशनल क्रश को भी सब्जी खरीदाना पडता है..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या आमदार अन् माजी महापौरात राडा; MLAच्या समर्थकांकडून महापौर विलास पाटलांच्या घरावर हल्ला

सोशल मीडियाचे 'स्टार' निवडणुकीत 'गार'; लाईक्स मिळाले पण मतांची बोंब, VIDEO

महापालिकांवर 'GEN Z'चा झेंडा; मुंबई महापालिकेतही घुमणार तरुणाईचा आवाज

Monday Horoscope : कामात धोका पत्करल्यास अडचणी येऊ शकतात; ५ राशींच्या लोकांनी कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, अन्यथा...

India vs New Zealand 3rd ODI: विराट कोहलीचं शतक व्यर्थ; टीम इंडियाचा इंदूर वनडेमध्ये दारूण पराभव,न्यूझीलंडने रचला इतिहास

SCROLL FOR NEXT