Methi Bhaji Recipe : हिवाळ्यात 'अशा' पद्धतीने बनवा मेथीची चटपटीत भाजी, मुलं आवडीने फस्त करतील टिफिन

Shreya Maskar

हेल्दी टिफिन

हिवाळ्यात मुलांना हेल्दी खाऊ घाला. टिफिनला चटपटीत लसूण- मेथीची भाजी द्या. खास रेसिपी आताच लिहू घ्या. मुलं आवडीने खातील.

Methi Bhaji | yandex

लसूण- मेथीची भाजी

लसूण- मेथीची भाजी बनवण्यासाठी चणा डाळ, तीळ, शेंगदाणे, पाणी, मेथी, तेल, लसूण, मीठ, जिरे, कांदा, लाल मिरची पावडर, हळद, टोमॅटो प्युरी इत्यादी साहित्य लागते.

Methi Bhaji | yandex

मेथी

लसूण- मेथीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. मेथी नीट स्वच्छ करा. यात खराब पानं येणार नाही, याची काळजी घ्या.

Methi | yandex

चणा डाळ

मिक्सरच्या भांड्यात भाजलेली चणा डाळ, पांढरे तीळ, शेंगदाणे आणि गरजेनुसार पाणी घालून पेस्ट बनवा.

Methi Bhaji | yandex

लसूण

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, लसूण, कांदा, लाल मिरची पावडर, हळद टाकून खमंग फोडणी तयार करा.

Garlic | yandex

मीठ

यात बारीक चिरलेली मेथी आणि चवीनुसार मीठ घालून तेलात परतून घ्या. फोडणीत तुम्ही खडे मसाले टाकू शकता.

Salt | yandex

डाळीची प्युरी

यात चणा डाळीची प्युरी, टोमॅटोची प्युरी घालून तेल सुटेपर्यंत शिजवा. त्यानंतर पाणी, मेथी टाकून भाजी शिजवून घ्या.

Pulse puree | yandex

चपाती-भाजी

गरमागरम चपाती आणि भातासोबत लसूणी मेथीची भाजीचा आस्वाद घ्या. हिवाळ्यात हा पदार्थ आवर्जून बनवा. शरीराला पोषक घटक मिळतील.

Methi Bhaji | yandex

NEXT : नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा ढाबा स्टाइल 'हा' पदार्थ

Potato Recipe | yandex
येथे क्लिक करा...