Shreya Maskar
घरी अचानक पाहुणे आले असतील तर चटपटीत दम आलू ही रेसिपी बनवा. सर्वांना हा पदार्थ खूप आवडेल. पाहुणे तुमचे कौतुक करतील.
दम आलू बनवण्यासाठी बटाटे, दही, तिखट, धणेपूड, सुंठपूड, बडीशेप, तमालपत्र, गरम मसाला, मीठ, खवा, तूप इत्यादी साहित्य लागते.
दम आलू बनवण्यासाठी बटाटे अर्धवट उकडवून घ्या. बटाटे उकडताना पाण्यात मीठ घाला.
उकडलेले बटाटे सोलून तेलात गोल्डन फ्राय करून घ्या. जास्त बटाटे परतू नका. नाही तर चव कडू होईल.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात धणेपूड, सुंठपूड, बडीशेप, तमालपत्र, गरम मसाला, खवा टाकून सर्व चांगले फेटून घ्या.
शेवटी यात फ्राय केलेले बटाटे आणि मीठ टाकून मिश्रण एकजीव करा. यात तुम्ही एक कप पाणी टाकून भाजी चांगली शिजवून घ्या.
त्यानंतर यात हिरवीगार कोथिंबीर टाका आणि लिंबू पिळा. अशाप्रकारे ढाबा स्टाइल चटपटीत दम आलू तयार झाला आहे.
गरमागरम चपातीसोबत दम आलू टेस्ट करा. तुम्ही यात तुमच्या आवडीचे पदार्थ देखील टाकू शकता.