National Cinema Day  Saam Tv
मनोरंजन बातम्या

National Cinema Day : राष्ट्रीय सिनेमा दिनात बदल; प्रेक्षकांना आता 'या' दिवशी पाहता येणार भरपूर चित्रपट

भारतात 23 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिन आयोजित करण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (Multiplex Association Of India) मागील काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला होता की भारतात (India) 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिन (National Cinema Day) आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये अनेक सिनेमे फक्त ७५ रुपयांमध्ये प्रेक्षकांना आपल्या अपेक्षेप्रमाणे चित्रपट पाहू शकणार आहेत. मोठ-मोठ्या शहरांमध्ये सरासरी तिकीटाची किंमत ही जास्त असल्याने एवढ्या कमी दरात प्रेक्षकांना चित्रपट पहायला मिळणार असल्याने सर्वच उत्सुक झाले आहेत. अनेकांनी १६ सप्टेंबरला चित्रपट पाहण्याची योजनाही आखली होती परंतू आता राष्ट्रीय चित्रपट दिन २३ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार, “रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्र (Bramhastra) हा सध्याचा प्रभावशाली चित्रपट आहे आणि तो चित्रपट सध्या अनेक चित्रपटांची रेकॉर्डब्रेक कमाई करीत आहे. तसेच दुसऱ्या आठवड्यात ही चित्रपटाने आपली यशस्वी घौडदौड कायम ठेवली आहे. डिस्ने हॉटस्टारवर (Disney Hotstar) ही लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे मल्टिप्लेक्स असोसिएशनला उत्सव एका आठवड्याने पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.”

इंडस्ट्री एक्सपर्ट्सच्या मते, " ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या टिकीटांमध्ये भरमसाठ पैसे होते, तरीही चाहत्यांनी चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये चित्रपटाने आपली घौडदौड कायम ठेवत दुसऱ्या आठवड्यातही घौडदौड तशीच कायम ठेवली आहे. म्हणून मल्टिप्लेक्स असोसिएशनच्या मते तिकीटची किंमत कमी न होणे ही व्यावसायिक चाल आहे.”

राष्ट्रीय सिनेमा दिन युएसएमध्ये ३ सप्टेंबरला साजरी केला होता. मल्टीप्लेक्सने कमी किंमतीत चित्रपटाची तिकीटे दिली होती. त्यासोबतच युके आणि मध्य-पुर्व देशही सामील होते. MAI च्या मते, PVR, Inox, Cinepolis, Carnival, Miraj, City Pride, Asian, Mukta A2, Movie Time, Wave, M2K, Delite इत्यादी मल्टिप्लेक्स देखील या उत्सवात सहभागी होणार आहेत.

Edited By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT