Brahmastra: रणबीर-आलियाच्या चित्रपटाने रीलीजनंतर ४ दिवसांत मोडले हे ६ रेकॉर्ड

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या संमिश्र प्रतिक्रियांनंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे.
Brahmastra
Brahmastra Saam Tv
Published On

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra) या चित्रपटाची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती. अखेर हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट यांच्या चित्रपटाच्या संमिश्र प्रतिक्रियांनंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. बॉलिवूडला दीर्घकाळ बॉयकॉटचा सामना करावा लागत होता, त्यामुळे दिग्दर्शक अयान मुखर्जीचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच नशीबवान ठरला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Brahmastra
TMKOC : आता तारक मेहता का उल्टा चष्मामधून जेठालालही गायब, होणार लवकरच रिप्लेस ?

पहिल्या ३ दिवसातच 'ब्रह्मास्त्र'ने फक्त हिंदी भाषेत ११२.२० कोटींचा व्यवसाय केला. तर, भारतात या चित्रपटाने एकूण १२४.४९ कोटींचा तर जगभरात सुमारे २२६.७५ कोटींचा व्यवसाय केला. रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट सुरुवातीपासूनच वादांनी घेरला होता. पण यानंतरही चित्रपटाच्या कलेक्शनवर नजर टाकली तर ही आकडेवारी कौतुकास्पद आहे. तसेच या चित्रपटाने काही दिवसात अनेक विक्रम केले आहेत.

बॉक्स ऑफिसवर आठवड्याचे शेवटचे ३ दिवस हा सामान्य वीकेंड असतो. ज्यामध्ये 'ब्रह्मास्त्र'ने फक्त भारतात १२४.४९ कोटी कमावले होते. म्हणजेच सामान्य वीकेंडनुसार, अयान मुखर्जीच्या चित्रपटाचे कलेक्शन हिंदी भाषेतील चौथ्या क्रमांकाचे ओपनिंग वीकेंड ठरले आहे. यापूर्वी प्रभासच्या 'बाहुबली २' ने १२८ कोटींचा व्यवसाय केला होता. रणबीर कपूरच्या 'संजू'ने ओपनिंग वीकेंडमध्ये १२०.६ कोटी रुपयांची कमाई केली होती. सलमान खानच्या 'टायगर जिंदा है'ने ११४.९३ कोटींचा व्यवसाय केला आणि चौथ्या क्रमांकावर 'ब्रह्मास्त्र' आहे ज्याने ११२.२० कोटी कमवले.

Brahmastra
Usha Nadkarni : 'माझा मानव माझ्या हृदयात कायमच असेल'; मराठी अभिनेत्रीला अजूनही येतेय सुशांतसिंगची आठवण

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा 'वॉर' हा चित्रपट एका दिवसात कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने पहिल्या दिवशी ५३.३५ कोटींचा व्यवसाय केला. या यादीत 'ब्रह्मास्त्र'ने ८व्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४१.२० कोटींचा व्यवसाय केला.

'ब्रह्मास्त्र'च्या पहिल्या तीन दिवसांच्या कमाईमुळे या चित्रपटाने बॉलिवूडच्या टॉप लीगमध्ये स्थान मिळवले आहे. 'केजीएफ 2' यावर्षी पहिल्या वीकेंडच्या रेकॉर्डमध्ये ३८०.१५ कोटींच्या व्यवसायासह पहिल्या क्रमांकावर आहे, तर 'ब्रह्मास्त्र' १२४.४९ कोटींची कमाई करून तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटाने ३२४ कोटींची कमाई करून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हिंदी चित्रपटांच्या पहिल्या वीकेंड कलेक्शनमध्ये 'ब्रह्मास्त्र'ने टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. 'केजीएफ 2' ने १९३.९९ कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या क्रमांकावर 'सुलतान' आहे ज्याने १८०.३६ कोटी कमवले. त्यानंतर हृतिक-टायगरच्या 'वॉर'ने १६६.२५ कोटींचा गल्ला जमवून तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले, त्यानंतर सलमान-कतरिनाच्या 'भारत'ने १५०.१० कोटींचा व्यवसाय केला. सलमानचा 'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट पुन्हा ५ व्या क्रमांकावर आहे, ज्याने १२९.७७ कोटींचे कलेक्शन केले आहे. सहाव्या क्रमांकावर प्रभासचा 'बाहुबली २', ज्याने १२८ कोटींचा व्यवसाय केला. ७ व्या क्रमांकावर आमिर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चे नाव येते. ज्याने १२३ कोटींचा व्यवसाय केला. रणबीर कपूरच्या 'संजू'चे नाव आठव्या क्रमांकावर आहे, ज्याचे कलेक्शन १२०.६ कोटी होते. ९ व्या क्रमांकावर 'टायगर जिंदा है'चे नाव आहे ज्याने ११४.९३ कोटी रुपये कमवले. १० व्या क्रमांकावर ११२.२० कोटींचा व्यवसाय करून 'ब्रह्मास्त्र'चे नाव नोंदवले गेले आहे.

दक्षिणेतील 'ब्रह्मास्त्र'ने वीकेंडमध्ये ३४.७० कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने कर्नाटकात ८.५ कोटी रुपयांची कमाई केली. आंध्र प्रदेश/तेलंगणात १९.२ कोटी, तामिळनाडूमधून ५.३ कोटी आणि केरळमधून १.६५ कोटींचा गल्ला केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com