भोंदू बाबा अशोक खरातवर चित्रपट येणार
बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार
अशोक खरातची काळी कृत्य मोठ्या पडद्यावर येणार
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अशोक खरातनंतर या प्रकरणात नेत्या रुपाली चाकणकर यांचे नाव समोर आले आहे. बाबा अशोक खरात यांनी अनेक महिलांना गंडा घातला आहे. या प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येत आहे. अशात आता सोशल मीडियावर भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांवर चित्रपट येणार असल्याच्या चर्चा रंगली आहे. या सिनेमात रुपाली चाकरणकरांच्या भूमिकेत बिग बॉस फेम अभिनेत्री झळकणार असल्याचे बोले जात आहे.
भोंदू बाबा अशोक खरात यांच्यावर येणाऱ्या चित्रपटात बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचे बोलले जात आहे. टिव्ही नाइनच्या वृत्तानुसार, दीपाली सय्यद या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारताना दिसणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
अभिनेत्री दीपाली सय्यदने चित्रपटाबद्दल सांगितले की, "'बिग बॉस मराठी' च्या घरातून बाहेर आल्यावर मला भोंदू बाबा अशोक खरात हे प्रकरण समजले.अशा भोंदू बाबांपासून प्रत्येकाने सावध राहावे. समाजात अनेक खरात आजही लपून बसले असतील..." चित्रपटाबद्दल दीपाली सय्यद म्हणाल्या की, "या चित्रपटात मी एका महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार...मात्र अद्याप माझी भूमिका नेमकी काय असेल, हे मी सांगणार नाही...ते तुम्हाला लवकरच चित्रपटात पाहायला मिळेल..." दिपाली सय्यद यांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबाबत कोणताही खुलासा केला नाही.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकरणकरांवर झालेल्या आरोपांबद्दल दीपाली सय्यद म्हणाल्या की," राजकारणात जे लोक काम करतात त्यावर आरोप प्रत्यारोप होत राहतात. या प्रकरणात खरंच रुपाली चाकणकर यांचा हात होता का? हे चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला कळेल..."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.