Nana Patekar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nana Patekar : "मला इंग्रजी येत नाही, हिंदीत बोल"; नाना पाटेकर असं का म्हणाले? पाहा VIDEO

Nana Patekar Video : सध्या सोशल मीडियावर नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, "मला इंग्रजी येत नाही हिंदीत बोल"

Shreya Maskar

नुकताच 'हाऊसफुल 5' चा धमाकेदार ट्रेलर (Housefull 5 Trailer ) रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला चित्रपटातील अनेक कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमात नाना पाटेकर (Nana Patekar ) देखील आले होते. तेव्हा मीडियाने त्यांच्याशी संवाद साधला. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

'हाऊसफुल 5'च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला एका पत्रकाराने नाना पाटेकर यांना इंग्रजीत प्रश्न केला. त्यावर नाना पाटेकर यांनी थेट उत्तर दिले की, "मला इंग्रजी येत नाही, हिंदीमध्ये प्रश्न विचार..." त्याच्या या उत्तराची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. त्याचे हे उत्तर ऐकून सर्वजण हसू लागले. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

'हाऊसफुल 5' रिलीज डेट

'हाऊसफुल 5'मध्ये नाना पाटेकर एक महत्त्वाची भूमिका साकारत असून त्यांचा कॉमेडी अंदाज ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपट 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करणार असल्याचे चित्र दिसत आहे.

'हाऊसफुल 5' स्टारकास्ट

'हाऊसफुल 5' चित्रपटात कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. या चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लीव्हर, श्रेयस तळपदे, डिनो शर्मा आणि नाना पाटेकर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.

नाना पाटेकर

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटात आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. कोणतीही भूमिका असो ते खूप छान पद्धतीने साकारतात. नाना पाटेकर कायम त्यांच्या स्पष्टवक्ता स्वभावासाठी ओळखले जातात. ट्रेलरमध्ये नानांचा हटके अंदाज व देसी लूक पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT