Nana Patekar Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nana Patekar Death : 'मी आज आहे, उद्या असेन की नाही...' नानांचे ते शेवटचे शब्द खरे ठरले |VIDEO

Nana Patekar last speech Video : नाना पाटेकरांच्या निधनानंतर त्यांच्या शेवटच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओत अभिनेते नेमकं काय बोलले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

नाना पाटेकरांचे गोव्यात निधन

नानांच्या शेवटच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

नानांचे शेवटचे शब्द ठरले खरे

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टी हादरली आहे. आज (८ ऑक्टोबर २०२६) सकाळी नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. नाना पाटेकरांच्या अचानक जाण्याने कलाकारांना, कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार, चाहते नानांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

नाना पाटेकर शेवटचे गोवा पर्यटन विभागाच्या एका कार्यक्रमात दिसले होते, जिथे त्यांनी भाषण केल्या. त्या भाषणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.सोशल मीडियावरील एका नेटकऱ्याने गोवा न्यूज हबचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात नाना पाटेकर प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसत आहेत. कार्यक्रमासाठी नानांनी पांढरा कुर्ता आणि पांढरा स्कार्फ (गमछा) परिधान केला होता.

नाना पाटेकर गोव्यातील एका कार्यक्रमात गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा नाना म्हणाले की, "आपल्या सर्वांनाच एक दिवस या जगातून जायचे आहे. मी उद्या असेन की नाही, हे मला माहित नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तो टप्पा कधीतरी येणारच आहे. पण त्याआधी, स्वतःला एक प्रश्न विचारा, मला जे करायचे आहे, ते मी करू शकत आहे का?" असे विचार या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना अभिनेत्याने मराठीतून मांडले.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील डोणजे येथील निवासस्थानी संध्याकाळी ४ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांच्या जीवाला धोका, दिल्लीतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई

Mumbai Metro : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो प्रवाशांना दिलासा! प्रवास गर्दीमुक्त होणार, ६ डब्यांची मेट्रो लवकरच धावणार

Garba Bangles Designs : साडी असो वा घागरा चोळी, नवरात्रीच्या लूकवर खुलून दिसतील बांगड्यांच्या 'या' ७ सुंदर डिझाइन्स

SCROLL FOR NEXT