Namita Thapar controversy saam tv
मनोरंजन बातम्या

Namita Thapar: अभिमान आहे हिंदू असल्याचा...! नमाजचे फायदे सांगितल्यावर ट्रोल झालेल्या नमिता थापरचं सडेतोड उत्तर

Namita Thapar controversy: नमाजच्या आरोग्य फायद्यांवरील व्हिडिओमुळे ट्रोल झालेल्या नमिता थापरने आता सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने धर्माचा आदर आणि महिलांप्रती सन्मान यावर जोर देत ट्रोलर्सना ठाम संदेश दिला.

Surabhi Jayashree Jagdish

शार्क टँकच्या प्रसिद्ध जज नमिता थापरने गेल्या महिन्यात एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये तिने नमाजच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी माहिती दिली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. केवळ तिलाच नाही, तर तिच्या आईलाही ऑनलाइन अपशब्द वापरण्यात आले. दरम्यान, यानंतर आता या एंटरप्रेन्योरने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

काय म्हणाली नमिता थापर?

नमिता थापरने तिच्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने सांगितलं आहे की, 'गेल्या तीन आठवड्यांपासून लोक मला प्रॉस्टिट्यूट म्हणत आहेत. इतकंच नाही, तर माझ्या आईला घाणेरड्या शिव्या देत आहेत. का? नमाजाच्या आरोग्यविषयक फायद्यांवर एक रील बनवल्यामुळे? मी एक हेल्थकेअर प्रोफेशनल आहे. मी अनेक हिंदू धर्मांवर, त्यांच्या आरोग्यविषयक फायद्यांवर रील्स बनवल्या आहेत... प्रत्येक योग दिवशी, मी आसनांवर, विशेषतः सूर्यनमस्कारावर रील्स बनवते, पण तेव्हा कोणी काहीच बोललं नाही."

नमिता पुढे म्हणाली, “मला शिकवलं गेलं आहे की 'R फॉर रिलिजन' म्हणजे 'R फॉर रिस्पेक्ट' आणि विशेषतः महिलांप्रती आदर दाखवण्याचा हाच मार्ग आहे. आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यास सगळे आवाज उठवतात. पण ज्यावेळी दोन महिलांचा अशा प्रकारे अपमान होतो तेव्हा लोक मौन पाळतात?

मला शिकवण आहे की, तुम्हाला स्वतःसाठी आवाज उठवावा लागेल. म्हणून माझ्या सर्व ट्रोलर्सनी लक्षात ठेवा की, हिंदू धर्मात कर्म नावाची एक संकल्पना आहे आणि मला हिंदू असल्याचा अभिमान आहे.

शेवटी नमिता म्हणाली, 'तुम्ही लोक जे काही करत आहात ते करत राहा. पण देव सगळं बघतोय आणि जे सुशिक्षित, स्वाभिमानी हिंदू आहेत, ज्यांचा असा विश्वास आहे की धर्म म्हणजे आदर, विशेषतः स्त्रियांचा आदर.'

काय आहे संपूर्ण प्रकरण?

२५ मार्च रोजी नमिता थापरने एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने मित्रांसोबत ईद साजरी करण्याबद्दल सांगितलं होतं. तिने सांगितलं की, तिच्या मित्रांनी नमाज हा एक प्रकारचा संपूर्ण शरीराचा व्यायाम असल्याचे सांगून त्याचे फायदेही समजावून सांगितले.

नमिताने स्पष्ट केलं की, नमाजमुळे लवचिकता वाढते, गुडघे आणि सांध्यांना आधार मिळतो, पचनक्रिया सुधारते आणि मानसिक आरोग्यासाठीही ते चांगलं असतं. तिचा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी तिचं कौतुक केलं. पण काहींनी तिला ट्रोल करून टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT