Naiyo Lagda Song Teaser Out Saam TV
मनोरंजन बातम्या

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Song: कधी न पाहिलेला सलमान खान-पूजा हेगडेचा हटके अंदाज, 'नइयो लगदा' गाणे लवकरच होणार प्रदर्शित

सलमान खान आणि पूजा हेगडे दिसणार रोमँटिक अंदाजात.

Pooja Dange

Naiyo Lagda Song Teaser Out: सलमान खानच सध्या कोणताही चित्रपट आला नसला तरी त्याची चर्चा हे. कारण अनेक चित्रपटांमध्ये त्याने कॅमिओ केला आहे. तसेच बॉलिवूड चित्रपट हिट होण्यासाठी सलमान प्रमोशनमध्ये सहभागी होत असतो. सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकताच 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझर बघितल्यानंतर भाईजानला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा 'नईयो लगदा'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये सलमान खान आणि पूजा हेगडे यांचा रोमँटिक अवतार पाहायला मिळत आहे.

सलमान खान 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. सलमान खानने त्याच्या चाहत्यांचा व्हॅलेंटाइन डेला आणखी खास बनवण्यासाठी त्याच्या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. हे एक रोमँटिक गाणे आहे, जे लदाखमध्ये शूट करण्यात आले आहे. या गाण्यात सलमान खानसोबत पूजा हेगडे दिसणार आहे. तसेच हे गाणे उद्या प्रदर्शित होणार आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत सलमान खान याने पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

'किसी का भाई किसी की जान'मधील 'नईयो लगदा' हे गाणे हिमेश रेशमियाने संगीतबद्ध केले आहे. तर, या गाण्याचे बोल शब्बीर अहमद आणि कमाल खान यांनी लिहिले आहेत. याशिवाय पलक मुच्छालने या गाण्याला आवाज दिला आहे. चाहत्यांना या गाण्याचा टीझर आवडला आहे. आता पूर्ण गाणे प्रदर्शित होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. या चित्रपटात सलमान खान पूजा हेगडेसोबत फ्लर्ट करताना दिसणार आहे, याशिवाय शहनाज गिलही तिच्या बॉलिवूड डेब्यू या चित्रपटाद्वारे करणार आहे.

व्यंकटेश दग्गुबती, भूमिका चावला, विजेंदर सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर हे देखील चित्रपटाचा एक भाग आहेत. हा चित्रपट यावर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT