Khashaba Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Khashaba Movie: नागराज मंजुळेंचा 'खाशाबा' नवा सिनेमा; परश्या,जब्यानंतर कोण असेल नवा अभिनेता, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Khashaba Movie : नागराज मंजुळे दिग्दर्शित खाशाबा जाधव या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.मुख भूमिकेत कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shruti Vilas Kadam

Bhakti Gothankar, Saam Tv

Khashaba Movie : मराठी चित्रपटसृष्टीचा डंका चहुबाजूंना गाजवणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक नवा कोरा सिनेमा घेऊन आपल्या भेटीला येणार आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्री,सैराट,नाळ यांसारख्या मराठी गावरान चित्रपटांनी देशभरातील लाखो प्रेक्षकांना वेड लावले. अनेक राज्यस्तरीय पुरस्कार देखील या सिनेमांनी पटकावले.

कोल्हापूरची लाल मातीमधील कुस्ती ऑलिंपिकमध्ये गाजवून महाराष्ट्रासाठी पहिले वैयक्तिक मेडल जिंकणार्या खाशाबा जाधवांचा प्रवास आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. खाशाबा जाधव या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला असून या सिनेमात कोणता नवा चेहरा झळकणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.

खाशाबा जाधव यांनी १९५२ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक पटकावले आणि भारतील क्रिडा विश्वात सुवर्णअक्षरांनी इतिहास घडवला.नागराज मंजुळे यांच्या सिनेमांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख भूमिका बजावणारा नट. नव्या सिनेमांसोबतच मराठी चित्रपटसृष्टीला नवे कोरे चेहरे मिळतात आणि पहिल्याच सिनेमात प्रसिद्धही होता.

नागराज मंजुळे दिग्दर्शित खाशाबा जाधव या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला असून जितेंन्द्र जोशी, महेश मांजरेकर, गिरिश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम आणि गार्गी कुलकर्णी यांसारख्या उत्कृष्ट कलाकरांची फळी आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे. परंतु मुख्य खाशाबा जाधव यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

टिझरमध्येही अभिनेत्याचा चेहरा थेट दाखवलेला नाही. खाशाबा यांच्या भूमिकेसाठी हजारो इच्छुक कलाकारांमधून कठोर निवडप्रक्रियेनंतर एका नव्या चेहर्याची निवड करण्यात आली.त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्धा हादरलं! मदतीच्या बहाण्याने फसवलं; रेल्वे स्थानकावर तरुणीवर सामूहिक अत्याचार

SBI ATM Rules: ऐकलं का! पुढील महिन्यापासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; जाणून घ्या किती आकारला जाणार चार्ज

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

SCROLL FOR NEXT