दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य याने पहिल्यांदाच माध्यमांशी बोलताना त्याच्या आणि शोभिता धुलिपालाच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केलेलं बघायला मिळालं आहे. यावेळी त्याने शोभिताचं कौतुक केलं आहे. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी काही दिवसांपूर्वीच लग्न करत नवा संसार थाटला आहे. यानंतर नागा चैतन्य याच्या समांथा रुथ प्रभूसोबतच्या घटस्फोटावरून शोभिता धुलिपाला हीला सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रॉल करण्यात आलं होतं. शोभिता ही समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाला कारणीभूत असल्याचं देखील यावेळी बोललं जात होतं.
या संपूर्ण प्रकरणावर अखेर नागा चैतन्य याने अखेर मौन तोडले आहे. समांथा रुथ प्रभूसोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलत असताना त्याने पत्नी शोभिता धुलिपाला हिचे देखील तोंडभरून कौतुक केलेले आहे. एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्याने शोभिताने ही सर्व परिस्थिती संयम आणि परिपक्वतेने हाताळली असल्याने ती 'खरी हीरो' असल्याचं म्हंटलं आहे. तसंच एक नातं तुटल्यामुळे आता नातं तोडताना १००० वेळा विचार करत असल्याचंही त्याने सांगितलं आहे.
समांथा आणि नागा चैतन्यने २०१७ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर ते २०२१ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले होते. चैतन्यने नंतर २०२४ मध्ये शोभिता धुलिपालाशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या उत्सवांना सामंथाच्या चाहत्यांकडून तीव्र ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यात दोघांच्या घटस्फोटाला शोभिताला जबाबदार ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर तब्बल ४ वर्षांनी नागा चैतन्य याने या संपूर्ण प्रकरणावर मौन तोडलं आहे.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना नागा चैतन्य म्हणाला की, 'मला शोभितासाठी खूप वाईट वाटते. ती त्याला पात्र नाही. या प्रकरणात तिची चूक नाही. ती माझ्या आयुष्यात आली. आम्ही खूप नैसर्गिक आणि सुंदर पद्धतीने भेटलो. इंस्टाग्रामवर सोशल मीडिया चॅटप्रमाणेच आमची मैत्री सुरू झाली आणि तिथूनच आमचे नाते हळूहळू तयार झाले. ती माझ्या भूतकाळाशी कोणत्याही प्रकारे जोडलेली नाही. पण ती खूप समजूतदार आणि धीरवान आहे. इतक्या परिपक्वतेने तिने या सर्व गोष्टींमधून मार्ग काढला. खरं तर, ती माझ्यासाठी अनेक प्रकारे एक खरी हिरो आहे. याचा सामना करणे सोपे नाही.' असं नागा चैतन्य याने म्हंटलं आहे.
समंथा रूथ प्रभूशी घटस्फोट घेतल्याबद्दल नागा चैतन्यने खुलासा केला आहे. तो म्हणाला की, 'लग्नात सहभागी असलेल्यांच्या भल्यासाठी हा निर्णय होता. निर्णय काहीही असो, तो खूप विचार करून आणि समोरच्या व्यक्तीबद्दल खूप आदर ठेवून घेतलेला एक जाणीवपूर्वक निर्णय होता. मी हे म्हणत आहे कारण हा माझ्यासाठी खूप संवेदनशील विषय आहे. मी एका तुटलेल्या कुटुंबातून आलो आहे. म्हणून मला हा अनुभव कसा असतो हे माहित आहे. नाते तोडण्यापूर्वी मी १००० वेळा विचार करेन कारण मला त्याचे परिणाम माहित आहेत. हा परस्पर निर्णय होता.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.