Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने भावाच्या लग्नात घातलेल्या नेकलेसची किंंमत किती? आकडा बघून डोळे पांढरेफट्ट पडतील!

Priyanka Chopra Necklace : बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या प्रियांका चोप्राने तिच्या भावाच्या लग्नात खूप मजा केली. सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्याय यांचे शुक्रवारी लग्न झाले.
Priyanka Chopra Necklace
Priyanka Chopra NecklaceGoogle
Published On

Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून भारतात आहे. प्रियांका तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी भारतात आली आहे. सिद्धार्थ आणि नीलम उपाध्यायच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात प्रियांका चोप्राने तिच्या स्टाईल सेन्सने चाहत्यांची मने जिंकली. सिद्धार्थ आणि नीलम यांचे लग्न ७ फेब्रुवारी रोजी म्हणजे काल झाले. यावेळी लग्नात अनेक खास पाहुणे उपस्थित होते. पण या सगळ्यामध्ये प्रियांका चोप्राच्या नेकलेसची आता खूप चर्चा होत आहे.

नेकलेसची किंमत ऐकून व्हाल थक्क

प्रियांका चोप्राने भाऊ सिद्धार्थच्या मेहंदीसाठी बल्गेरी नेकलेस घातला होता. विशेषतः जेव्हा चाहत्यांनी तिच्या नेकलेसकडे पाहिले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. आता इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे की प्रियांका चोप्राने तिच्या भावाच्या मेहंदी समारंभात घातलेला हार १०-१२ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.तसेच, मेहंदी समारंभासाठी प्रियांकाने राहुल मिश्राने डिझाइन केलेला कस्टम कॉर्सेट लेहेंगा घातला होता.

Priyanka Chopra Necklace
Shivali Parab: शिवाली हे खरं आहे.... कल्याणच्या चुलबुलीचे मानधन तुम्हाला माहिती आहे का?

लग्नाला कोण कोण उपस्थित होते?

नीलम आणि सिद्धार्थ यांचे लग्न ७ फेब्रुवारी रोजी झाले. या लग्नात प्रियांकाचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. प्रियांका तिची मुलगी मालती मेरीसोबत लग्नाला आली होती. नंतर, निक जोनास, त्याचे पालक पॉल जोनास सीनियर आणि डेनिस मिलर जोनास देखील लग्नासाठी आले. प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्रा तिचा पती राघव चड्ढासोबत लग्नाला उपस्थित होती. लग्नात मन्नारा चोप्रा देखील दिसली.

Priyanka Chopra Necklace
Vicky Kaushal: 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत होणार विकी कौशलची एन्ट्री? चाहत्यांना मिळणार मोठं सरप्राईज!

फॅशन वेबसाइट डायट सब्यानुसार, प्रियांकाने परिधान केलेल्या बल्गेरी नेकलेसमध्ये ७ पेर फळाच्या आकाराचे मॉर्गनाइट्स, ६ कुशन-कट मँडरीन गार्नेट आणि ९ कॅबोचॉन अ‍ॅमेथिस्ट होते. मेहंदीपूर्वी प्रियांकाने तिच्या भावाच्या हळदी समारंभातही धमाल केली. लग्नाच्या एक दिवस आधी झालेल्या संगीत समारंभात प्रियांकाने तिच्या कुटुंब आणि मित्रांसोबत खूप नाच केला.

विशेष म्हणजे प्रियंकाने भाऊ सिद्धार्थच्या लग्नात घातलेल्या हाताची देखील विशेष चर्चा सुरु आहे. या हिऱ्यांच्या हारात ७१.२४ कॅरेटचे हिरे आणि ६२ पाचूचे मणी आहेत जे एकूण १३०.७७ कॅरेट आहेत, यामुळे हा हार आणखी उठून दिसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com