Famous Actress saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actress : लग्नाच्या ४ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री घेणार घटस्फोट? नवऱ्याला केले अनफॉलो, लग्नाचे फोटोही Delete

Famous Actress Divorce? : प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

Shreya Maskar

टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत.

अभिनेत्रीने आपल्या नवऱ्याला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे.

तसेच लग्नाचे फोटो डिलिट केले.

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागिन फेम अभिनेत्री घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. जानेवारी २०२२ मध्ये लग्न बंधनात अडकलेली अभिनेत्री मौनी रॉय तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. मौनी रॉय आणि तिचा नवरा सूरज नांबियार यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. ज्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच सूरजने मौनीसोबतचे लग्नाचे फोटोही डिलीट केले आहेत.

मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा किंवा माहिती दिली नाही. मात्र त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे दिसून येत आहे. मौनी रॉयही टिव्ही आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर मौनीचे 33.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती फोटोशूट, प्रोजेक्ट, नवऱ्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना अपडेट देत राहते. मात्र अलिकेड खूप काळा झाला, दोघे एकमेकांसोबतचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत नाही.

सोशल मीडियावर मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या नात्याची चर्चा रंगली असताना, चाहते मात्र चिंतेत पडले आहे. सोशल मीडियावर कमेंट करून आपली चिंता व्यक्त करताना चाहते दिसत आहेत. मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांचा २७ जानेवारी २०२२ रोजी गोव्यामध्ये शाही थाटामाटात लग्नसोहळा पार पडला.

मौनी रॉय करिअर

मौनी रॉयला 'नागिन' या शोमुळे खूप लोकप्रियता मिळाली. तिने रिअलिटी शोमध्ये देखील भाग घेतला आहे. तसेच तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'ब्रह्मास्त्र', 'वेले', 'ब्लॅकआउट', 'लव्ह सेक्स और धोखा 2', 'गोल्ड' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चाहते तिच्या सौंदर्याचे, अभिनयाचे आणि फिटनेसचे चाहते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT