Naagin Fame Madhura Naik Shared On Video Instagram
मनोरंजन बातम्या

Naagin Fame Madhura Naik Video: ‘नागिन’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, इस्राइल-हमास युद्धात दहशतवाद्यांनी मुलांच्या समोरच बहीण-भावजींची केली हत्या

Naagin Actress Madhura Naik News: नागिन फेम मधुरा नाईकने इस्रायल-पॅलेस्टिनी युद्धामध्ये आपल्या घरातील अगदी जवळच्या व्यक्तींना तिने गमावलंय. नातेवाईकांच्या निधनानंतर अभिनेत्रीने भावनिक पोस्ट शेअर केली.

Chetan Bodke

Naagin Fame Madhura Naik Shared On Video

पॅलेस्टिनी आणि इस्राइलमधील तणाव अधिकच तीव्र होताना दिसत आहे. या युद्धामध्ये दोन्ही राष्ट्राची मोठ्या प्रमाणात हानी होत असून दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अशातच ‘नागिन’ फेम मधुरा नाईकवर (Madhura Naik) दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मधुराने इस्रायल-पॅलेस्टिनी युद्धामध्ये तिने आपल्या घरातील अगदी जवळच्या व्यक्तिंना गमावलंय. अशा अचानक एक्झिटने तिच्यासह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच अभिनेत्रीने भावनिक पोस्ट शेअर करत बहिणीच्या आणि तिच्या भाऊजींच्या निर्घृण हत्येबद्दलची माहिती दिली.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मधुरा नाईक इस्रायलला पाठिंबा देत असून बहिणीच्या आणि भाऊजींच्या जाण्याचे दुःख व्यक्त करते. मधुरा नाईकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून सध्या तो प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओसोबतच मधुरा नाईकने एक भावूक पोस्ट सुद्धा शेअर केलेली आहे.

अभिनेत्री व्हिडीओमध्ये म्हणते, “मी मधुरा नाईक आहे, माझा भारतात एका ज्यू कुटुंबीयामध्ये जन्म झाला. सध्याच्या घडीला भारतामध्ये ज्यू धर्मियांची संख्या जेमतेम ३००० पर्यंतच आहे. ७ ऑक्टोबरच्या आधी आम्ही आमच्या कुटुंबातला एक मुलगा आणि एक मुलगी गमावली. माझी बहिण ओडाया आणि तिच्या पतीचा मृत्यू तिच्या दोन मुलांच्या समोर झाला. त्यांच्या मुलांच्या समोरच त्या दहशतवाद्यांनी माझ्या बहिणीला आणि तिच्या पतीला मारलं. माझ्यावर आणि कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या जाण्याचे दु:ख मला शब्दात सांगण्या इतपत नाही.”

अभिनेत्री पुढे व्हिडीओमध्ये म्हणते, “आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या भावना तुमच्यासमोर व्यक्त करीत आहे. आजपर्यंत तुम्ही माझ्यावर भरपूर प्रेम दाखवलेत. मला चांगला पाठिंबा दिला. पण मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. मी सोशल मीडियावर माझी बहीण, तिच्या पतीचा आणि तिच्या दोन मुलांचा फोटो शेअर केला होता. जगाने आमचं दु:ख पाहावं म्हणून मी ते फोटो शेअर केलेय. पण पॅलेस्टाईनचा प्रपोगंडा कसा चाललाय हे पाहून मी आश्चर्यचकित झाले. हा प्रो पॅलेस्टाईन प्रपोगंडा इस्रायलच्या नागरिकांना खलनायकी वृत्तीचे दाखवत आहेच. ही बाब चुकीची आहे. स्वत:चा बचाव करणे म्हणजे दहशतवाद नाहीये. मी कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करीत नाही, ही बाब मला इथे स्पष्ट करायची आहे.” असंही ती व्हिडीओमध्ये म्हटली आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्री मधुरा नाईकबद्दल सांगायचे तर, ती एक टिव्ही अभिनेत्री असून तिने अनेक प्रसिद्ध टिव्ही मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. नागिन, प्यार की एक कहाणी, तेनाली रामा, कॉमेडी क्लासेस, कहाणी घर घर की अशा अनेक मालिकेच्या माध्यमातून तिने चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

SCROLL FOR NEXT