Amitabh Bachchan Birthday: एकापाठोपाठ एक चित्रपट ठरले फ्लॉप, कोट्यवधींचं होतं कर्ज...पण बीग बिंनी नाही मानली हार; असा आहे महानायकाचा खडतर प्रवास

Amitabh Bachchan Filmy Career: बिग बींनी आपल्या ५० वर्षांपेक्षा अधिकच्या फिल्मी करिअरमध्ये अनेकदा अपयशाचा देखील सामना केला आहे.
Amitabh Bachchan Birthday
Amitabh Bachchan BirthdaySaam Tv
Published On

Happy Birthday Amitabh Bachchan:

बॉलिवूडचे (Bollywood) 'महानायक' अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे आज आपला ८१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बींनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यांचा महानायकापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप ठरले, कोट्यवधीचं कर्ज, हातातून घरंही जाणार होते. पण बिग बींनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

बिग बींनी आपल्या ५० वर्षांपेक्षा अधिकच्या फिल्मी करिअरमध्ये अनेकदा अपयशाचा देखील सामना केला आहे. त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपटही दिले आहेत. आजही अमिताभ बच्चन लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. बिग बींच्या वाढदिवसानिमित्त (Amitabh Bachchan Birthday) आज आपण त्यांच्या महानायकापर्यंतच्या खडतड प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत....

इंजिनीअर व्हायचे होते पण झाले अभिनेता -

अमिताभ बच्चन यांचे खरे आडनाव श्रीवास्तव आहे. त्यांच्या वडिलांप्रमाणे ते त्यांचे आडनाव बच्चन असे लिहितात. त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्यांचे आडनाव श्रीवास्तववरून बच्चन केले होते. त्यामागचे खरे कारण म्हणजे त्यावेळी भारतातील जातिव्यवस्था होती. ज्याच्या निषेधार्थ त्यांनी आपले आडनाव बदलले होते. अमिताभ बच्चन यांना इंजिनीअर होऊन हवाई दलात भरती व्हायचं होतं. पण नशिबाला ते मान्य नव्हते. अमिताभ बच्चन यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि ते आज बॉलिवूडचे बादशाह झाले आहे.

Amitabh Bachchan Birthday
Aftab Shivdasani: अभिनेता अफताब झाला सायबर फ्रॉडचा शिकार; मेसेजवर क्लिक करताच गमावले लाखो रुपये

व्हॉइस आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरुवात -

बिग बींनी आपल्या करिअरची सुरूवात व्हॉइस आर्टिस्ट म्हणून केली होती. आज चाहत्यांना वेड लावलेल्या त्यांच्या आवाजामुळेच ऑल इंडिया रेडिओने त्यांना नाकारले होते. १९६९ मध्ये मृणाल सेन यांच्या 'भुवन शोम' या चित्रपटात व्हॉइस आर्टिस्ट म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली. 1977 मध्ये त्यांनी सत्यजित रे यांच्या 'शतरंज के खिलाडी' चित्रपटातही आवाज दिला होता. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांना त्यांच्या उंचीपासून ते आवाजापर्यंतच्या टीकेला सामोरे जावे लागले. करिअरच्या सुरुवातीला सलग १२ फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर ते आता लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.

Amitabh Bachchan Birthday
Ranbir Kapoor: रणबीर कपूरने 'रामायण'साठी सोडलं नॉनव्हेज, नेमकं काय आहे कारण?

'जंजीर' चित्रपटाने आयुष्य बदलले -

'सात हिंदुस्तानी' या चित्रपटापासून अभिनेता म्हणून बिग बींनी आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. मात्र त्याना आपला ठसा उमटवण्यात यश आले नाही. अमिताभ बच्चन यांच्या 'जंजीर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील यशाचे यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले. या चित्रपटामुळे त्यांचे आयुष्यचं बदलले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांनी २०० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे.

Amitabh Bachchan Birthday
Tejas Movie Dialogue: PM मोदींना क्रेडिट द्यायला विसरू नका; नेटकऱ्याच्या प्रश्नाला कंगना रनौतने दिलं जबरदस्त उत्तर

कर्जबाजारी झाले होते बिग बी -

१९९ मध्ये अमिताभ बच्चन यांनी एक प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. ज्याच्या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. पण दुर्दैवाने सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. याचा परिणाम असा झाला की, अमिताभ बच्चन यांच्या कंपनीवर ९० कोटी रुपयांचे कर्ज झाले. त्यावेळी अमिताभ बच्चन यांना दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यांच्या घरावर अटॅचमेंट नोटीस चिकटवण्यात आली होती. त्यावेळी परिस्थिती अशी होती की बिग बी आपल्या कर्मचाऱ्यांना पगारही देऊ शकत नव्हते. त्यावेळी परदेशात शिकणाऱ्या अभिषेकलाही आपले शिक्षण सोडून मायदेशी यावे लागले होते. संपूर्ण बच्चन कुटुंबासाठी हा टप्पा सर्वात वाईट होता. यातून बाहेर येण्यासाठी त्यांना मार्ग सापडत नव्हता.

Amitabh Bachchan Birthday
Akshay Kumar On Pan Masala Ad: पानमसाल्याच्या जाहिरातीवर अक्षय कुमारने दिलं स्पष्टीकरण, नेमकं सत्य काय आहे?

धीरूभाई अंबानींनी दिली मदतीची ऑफर -

त्याकाळी देशातील प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी यांना अमिताभ यांच्या स्थितीची दया आली. त्यांनी अमिताभ यांचा मित्र असलेला त्यांचा धाकटा मुलगा अनिल अंबानी याच्यामार्फत बिग बींना मदतीची ऑफर पाठवली. पण बिग बींनी ती मदत घेण्यास आदराने नकार दिला. स्वत:च्या हिमतीने सर्वकाही ठीक करेल असं त्यांनी ठरवले. त्यावेळी अमिताभ यांना वाटले होते की, आपण आजही अभिनय करू शकतो आणि यातूनच ते पुढे गेले.

Amitabh Bachchan Birthday
Shahid Kapoor New Movie: शाहिद कपूर साकारणार 'हे' ऐतिहासिक पात्र; लवकरच होणार शुटिंगला सुरुवात

यश चोप्रांकडून घेतली मदत -

त्याकाळी अमिताभ बच्चन थेट चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्याकडे गेले होते. त्यानंतर यश चोप्रांनी त्याला 'मोहब्बतें' या चित्रपटात कास्ट केले. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि बिग बींच्या बऱ्याच अडचणी काहीशा सोप्या झाल्या. यानंतर बिग बींना टीव्हीवर 'कौन बनेगा करोडपती' हा गेम शो ऑफर करण्यात आला. अडचणीत असल्यामुळे बिग बींनी पैशासाठी हा शो देखील स्वीकारला. पण त्यावेळी जया बच्चन बिग बींच्या या निर्णयावर खूश नव्हत्या. कारण त्याला वाटत होते की, बिग बी हे टीव्हीसाठी नव्हे तर मोठ्या पडद्यासाठी बनले आहेत. पण अमिताभ बच्चन यांना विश्वास होता आणि हा शो हिट झाला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यावर असलेले सर्व कर्ज फेडून टाकले.

Amitabh Bachchan Birthday
Tiger 3 New Poster: 'टायगर ३'मधील कतरीना कैफचा फर्स्ट लूक समोर, हातात बंदूक घेऊन स्टंट करताना दिसली झोया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com