Naagin 7 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Naagin 7 : प्रतीक्षा संपली! 'नागिन ७' ची पहिली झलक, मुख्य भूमिकेत कोण?

Naagin 7 First Look : 'नागिन ७'चा धमाकेदार टीझर समोर आला आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत कोण, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'नागिन ७' ची पहिली झलक समोर आली आहे.

'नागिन ७'चा टीझर पाहून चाहते शोसाठी उत्सुक आहेत.

'नागिन ७' एकता कपूरचा शो आहे.

प्रेक्षकांची आवडती मालिका 'नागिन' आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा नुकताच टीझर रिलीज करण्यात आला आहे. एकता कपूरच्या 'नागिन' शोच्या सातव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कलर्स टिव्हीने 'नागिन 7'च्या (Naagin 7) टीझर शेअर केला आहे. ज्याला खूप हटके कॅप्शन देण्यात आले आहे.

'नागिन'च्या टीझरमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलात एक मोठा साप सरपटताना दिसत आहे. तसेच पाश्वभूमी "वो आ रही है" असा आवाज ऐकू येत आहे. टीझरच्या व्हिडीओला कॅप्शन दिलं की, "जिस की बेसबरी से राह देखी आपने हर दिन, आ राही है आपसे मिलने नागिन!" यामुळे आता प्रेक्षक खूप खुश आहे. व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'नागिन' ही छोट्या पडद्यावरचा गाजलेला शो आहे. आतापर्यंत शोचे सहा सीझन धमाकेदार पद्धतीने पार पडले आहे.

'नागिन' पाहण्यासाठी प्रेक्षक दिवाने आहेत. 'नागिन 7'चे ग्राफिक व्हिज्युअल्स लय भारी आहेत. 'नागिन 7'ची निर्माती एकता कपूर आहे. मात्र अद्याप 'नागिन 7'ची रिलीज डेट जाहीर झाली नाही आहे. चाहते शो पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.

'नागिन 7' मुख्य अभिनेत्री कोण?

'नागिन 7'ची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर मुख्य भूमिकेत कोण असणार, याची चर्चा पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'नागिन 7'मध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री प्रियंका चाहर चौधरी आणि ईशा मालवीय दिसणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप अभिनेत्रीच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नाही. 'नागिन 6'मध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री तेजस्वी प्रकाश झळकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teachers Recruitment: सुवर्णसंधी! राज्यात ६२०० प्राध्यापक आणि २९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी भरती, अर्ज करण्याची मुदत काय?

Pitru Paksha Rituals: पितृपक्षात वाढदिवस साजरा करावा का? शास्त्र काय सांगते

Brain Eating amoeba : सावधान! देशात मेंदू खाणाऱ्या अमिबाचा पुन्हा उद्रेक, केरळमध्ये १९ जणांचा मृत्यू | VIDEO

Maharashtra Live News Update: आयफोन १७ घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी

Mosquito Bite Remedy : डास चावल्यानंतर लगेच काय करावे?

SCROLL FOR NEXT