Ekta Kapoor Birthday: सिरियलमध्ये थाटामाटात लग्न लावणारी एकता कपूर आहे सिंगल; 'या' कारणामुळे कधीच केल नाही लग्न

Ekta Kapoor: टीव्ही क्वीन एकता कपूर ५० वर्षांची झाली आहे, पण तिने अजून लग्न केलेले नाही. तिला वयाच्या १५ व्या वर्षी लग्न करायचे होते, पण तिचे वडील जितेंद्र यांनी असे काही सांगितले ज्यामुळे तिचे आयुष्य बदलले.
Ekta Kapoor
Ekta KapoorSaam Tv
Published On

Ekta Kapoor: भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील एक प्रभावशाली नाव असलेल्या एकता कपूरने ७ जून २०२५ रोजी आपला ५०वा वाढदिवस साजरा केला . सुपरस्टार जितेंद्र आणि शोभा कपूर यांच्या कन्या असलेल्या एकता कपूरने आपल्या कारकिर्दीत अनेक यशस्वी मालिका आणि चित्रपटांची निर्मिती केली आहे .

एकता कपूरने १५ व्या वर्षीच लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती . तथापि, तिच्या वडिलांनी तिला सांगितले की, "तू लग्न कर, नाहीतर सगळं सोडून पार्टी कर, किंवा करिअर बनव." या सल्ल्याने प्रेरित होऊन, एकता कपूरने आपल्या कामाशीच लग्न केल्यासारखे समर्पण दाखवले .

Ekta Kapoor
Hina Khan: 'पता नहीं कल क्या हो...'; लग्नात भावुक झाली हिना खान, पती रॉकीसाठी व्यक्त केल्या भावना

एकता कपूरने २७ जानेवारी २०१९ रोजी सरोगसीच्या माध्यमातून एक मुलीची आई बनली . एकताने टीव्ही मालिका व्यतिरिक्त तिने 'क्योंकी मैं झूट नहीं बोलता', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'शूटआउट अॅट लोखंडवाला', 'शूटआउट अॅट वडाळा', 'एक व्हिलन', 'रागिनी एमएमएस', 'मैं तेरा हिरो', 'कुछ तो है' असे अनेक चित्रपट केले.

Ekta Kapoor
Samsaara: जन्म आणि मृत्यू हे सहोदर आहेत...; भयावह अनुभव देणाऱ्या 'समसारा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

एकताकडे करोडोंची संपत्ती आहे

एकता कपूर ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्मात्यांपैकी एक आहे, जी आज स्वतः करोडोंची मालक आहे. २०२४ मध्ये फायनान्शियल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एकताची संपत्ती ११.३० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ९५ कोटी रुपयांची आहे. तिचे वार्षिक उत्पन्न ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com