Hina Khan: 'पता नहीं कल क्या हो...'; लग्नात भावुक झाली हिना खान, पती रॉकीसाठी व्यक्त केल्या भावना

Hina Khan Wedding: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयसवाल यांनी ४ जून २०२५ रोजी मुंबईत एका खासगी आणि नोंदणीकृत विवाह सोहळ्यात विवाह केला.
Hina Khan Wedding
Hina Khan WeddingSaam Tv
Published On

Hina Khan Wedding: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयसवाल यांनी ४ जून २०२५ रोजी मुंबईत एका खासगी आणि नोंदणीकृत विवाह सोहळ्यात विवाह केला. या विवाहात केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. हिना आणि रॉकी यांनी त्यांच्या विवाहाचे भावनिक क्षण सोशल मीडियावर शेअर केले, ज्यात त्यांच्या प्रेमाची गहिराई स्पष्टपणे दिसून येते.

विवाहाच्या व्हिडिओमध्ये, हिना खान आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाली, "ही केवळ शपथ नाही, ही एक भावना आहे. प्रेमात असणे सुंदर आहे, पण एका स्त्रीला तिच्या सर्व वाईट काळात स्वीकारणे, हा जगातील सर्वात मोठे आशीर्वाद आहे. मला माहित नाही उद्या काय होईल, पण आज मी तुझी आहे."

Hina Khan Wedding
Shocking! प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकावर गुन्हा दाखल; ड्रायव्हरला चाकूने मारल्याचा आरोप

रॉकी जयसवालनेही त्याच्या प्रेमाची गहिराई व्यक्त करताना सांगितले, "ती केवळ माझं विश्व नाही, ती माझं आत्मा आहे, माझं हृदय आहे. तिचं हसणं सर्व काही अर्थपूर्ण करतं. त्यामुळे प्रत्येकाने हे सुनिश्चित करावं की ती नेहमी हसत राहील."

Hina Khan Wedding
Housefull 5 Leaked: 'हाउसफुल 5' झाला पायरसीचा शिकार; 'या' साईटवर लीक झाला खिलाडी अक्षय कुमारचा चित्रपट

हिना खानने या खास दिवशी डिझायनर मनीष मल्होत्राची ओपल ग्रीन रंगाच्या साडी परिधान होती, ज्यावर पारंपरिक झरदोसी काम केलेले होते. तिच्या साडीवर देवनागरी लिपीत 'हिना' आणि 'रॉकी' ही नावे लिहिली आहेत. या विवाहाच्या व्हिडिओला हिना खानने "ही केवळ शपथ नाही, ही आमची खरी भावना आहे. हेच आम्हाला 'HiRo' बनवतं, एक युनिट, एक ध्येय, एक बंध" असे कॅप्शन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com