Tumbbadchi Manjula  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tumbbadchi Manjula: तुंबाडची मंजुळा नक्की कोण? मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशीची कोकणातली हॉरर स्टोरी

Tumbbadchi Manjula: ‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटाचा रहस्यमय टीझर प्रदर्शित झाला असून सई ताम्हणकरच्या भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे. ५ जूनला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Shruti Vilas Kadam

Tumbbadchi Manjula: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या 'तुंबाडची मंजुळा' या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. पहिल्याच पोस्टरपासून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाचा रहस्यमय आणि उत्कंठावर्धक टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटाने टीझरमधूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

टीझरमध्ये ‘मंजुळा’ या नावाभोवती तयार झालेलं गूढ वातावरण, गावकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली भीती आणि त्यांची उडालेली तारांबळ प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. कोकणातील एका गावात घडणाऱ्या अद्भुत घटनेवर आधारित ही कथा असल्याचे टीझरवरून स्पष्ट होते. गावातील विविध व्यक्तिरेखा आणि त्यांची अतरंगी शैली यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, अथर्व रुके, प्रियाल नाईक आणि उषा नाडकर्णी यांसारखी कलाकारांची भक्कम फौज दिसणार आहे. विशेषतः भविष्य सांगणाऱ्या गुरुजीच्या भूमिकेत मकरंद अनासपुरे यांचा लूक आणि संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

टीझरच्या शेवटी अर्धवट बंद दाराआड उभी दिसणारी सई ताम्हणकर ही सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. तिची भूमिका नेमकी काय असेल, याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, टीझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. कोकणातील गाव, तिथली माणसं आणि एका गूढ घटनेवर आधारित ही कथा सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल, असा त्यांचा विश्वास आहे.

ऋषिकेश तुरई यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगांवकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने केले आहे. झी स्टुडिओजतर्फे उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट येत्या ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकण मुख्य चौकात पाण्याचं साम्राज्य; गटार तुंबल्याने महामार्गावर पाणी

Heatwave News: उकाड्याचा कहर! जगातील सर्वात उष्ण 20 शहरांमध्ये भारतातील शहरांचा समावेश, पाहा संपूर्ण लिस्ट

Weight Loss: जाड मांड्या आणि हिप्सवरील चरबी कमी करायची आहे? आहारात समाविष्ट करा हे ७ पदार्थ

देशाच्या राजकारणात काही तरी मोठं घडणार? भाजपची २२ लोकसभा अन् ८ राज्यसभा खासदार असलेल्या पक्षावर नजर

Mumbai Metro Line 11: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सर्वात महत्त्वाच्या अंडरग्राऊंड मेट्रो प्रकल्पाला वेग; काम कुठंपर्यंत आलं?

SCROLL FOR NEXT