Shruti Vilas Kadam
ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हिप्स आणि मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी ओट्स फायदेशीर ठरतात.
अंड्यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. प्रोटीनमुळे शरीरातील मेटाबॉलिझम सुधारतो आणि फॅट बर्निंग प्रक्रिया वेगाने होते. त्यामुळे शरीर सडपातळ ठेवण्यास मदत मिळते.
पालक, मेथी, ब्रोकलीसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये कमी कॅलरीज आणि जास्त पोषक घटक असतात. या भाज्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात.
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फॅट बर्निंग गुणधर्म असतात. नियमित ग्रीन टी घेतल्यास शरीरातील अतिरिक्त फॅट कमी होण्यास मदत मिळू शकते.
बदाम, अक्रोड आणि चिया सीड्ससारखे पदार्थ हेल्दी फॅट्स आणि प्रोटीनने समृद्ध असतात. हे पदार्थ शरीराला ऊर्जा देतात आणि अनावश्यक खाण्याची इच्छा कमी करतात.
दही व ताकामधील प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. चांगले पचन आणि योग्य मेटाबॉलिझममुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया सोपी होते.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.