Abhijit bichukale Saam tv
मनोरंजन बातम्या

Abhijit bichukale: माझं नाव शाहरुख, सलमान, बच्चन यांच्यासोबत घ्या; गौतमीवरील प्रश्नावर बिचुकलेंचे एका वाक्यात उत्तर

Abhijit bichukale on Gautami Patil: सध्या गौतमीला चित्रपट मिळत आहेत. तुम्हाला चित्रपट कधी मिळणार, या प्रश्नाला उत्तर देताना माझं नाव घ्यायचं असेल तर बच्चन, शाहरुख, सलमान खान यांच्या बरोबर घ्या, असं रोखठोक उत्तर अभिजीत बिचुकले यांनी माध्यमांशी बोलताना दिलं

Vishal Gangurde

अक्षय बडवे, पुणे

Abhijit bichukale Latest News:

बिग बॉस रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीस आलेले अभिजीत बिचुकले नेहमी विविध कारणामुळे चर्चेत असतात. अभिजीत बिचुकले त्यांच्या रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे राज्यभरात प्रसिद्ध आहेत. हिंदी बिग बॉसमधील त्यांची एन्ट्री खूपच गाजली. याचदरम्यान, सध्या गौतमीला चित्रपट मिळत आहेत. तुम्हाला चित्रपट कधी मिळणार, या प्रश्नाला उत्तर देताना माझं नाव घ्यायचं असेल तर बच्चन, शाहरुख, सलमान खान यांच्या बरोबर घ्या, असं रोखठोक उत्तर अभिजीत बिचुकले यांनी माध्यमांशी बोलताना दिलं. (Latest Marathi News)

अभिजीत बिचुकले यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बिचुकले यांनी राज्यभरातील मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीवर भाष्य करताना बिचुकले म्हणाले, 'मी बहुजन समाजाचा आहे. पण माझं जे शिक्षण झालं त्यात आम्हाला आरक्षणासंदर्भात काहीच माहिती नाही. मी अतिशय हुशार होतो आणि मी माझ्या कष्टाने स्टारडम मिळवलं आहे. आम्ही आरक्षणाशिवाय मोठे झालो आहोत'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तत्पूर्वी,राज्यात एकीकडे नृत्यांगणा गौतमीच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. याच चर्चेवरून, गौतमी पाटीलला चित्रपट मिळत आहेत, तुम्हाला कधी मिळणार या प्रश्नावर बिचुकलेंनी रोखठोक उत्तर दिलं. 'माझ्या बरोबर नाव घ्यायचं असेल तर बच्चन, शाहरुख, सलमान खान यांच्याबरोबर घ्या. मी कोणाच्या हाताखाली काम करत नाही.मी कोणाचाही झेंडा घेऊन फिरत नाही, असं उत्तर बिचुकले यांनी दिलं.

मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी समाजाच्या मागणीवरही यावेळी बिचुकले यांनी भाष्य केलं. 'आरक्षणाचा विषय सरकारचा आहे. मी सर्व बांधवांना सांगतो की, माझ्या सारख्या अभ्यासू, हुशार आणि निर्व्यसनी असलेल्या माणसाच्या हातात सत्ता द्या आणि मी माझा पक्ष घेऊन येतो. सर्व प्रश्न आपण बसून सोडवू. जे जे शक्य आहे, ते आपण करू. मराठा समाजाचे अनेक नेते राज्यात आहेत. त्यांचं राज्य सध्या सुरू आहे. पण त्यांना ते जमलं नाही, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: सांगलीमध्ये घरात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

दोन लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल शानदार व्याजदर; 'या' बँकेने आणलीय धमाकेदार योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Property Rules: 'कुलमुखत्यारपत्र' म्हणजे काय रं तात्या? जमीन,मालमत्तेच्या व्यवहारात कसा होतो फायदा?

SCROLL FOR NEXT