Munjya Movie OTT Released Saam Tv
मनोरंजन बातम्या

Munjya Movie : अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा येतोय ब्रह्मराक्षस 'मुंज्या', ओटीटीवर पहायला मिळणार मुंज्याची अपूर्ण इच्छा

Munjya Movie OTT Released : शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांच्या 'मुंज्या' चित्रपटाने अवघ्या काही दिवसात १०० कोटींच्यावर कमाई केली. दरम्यान, 'मुंज्या' चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉमवर लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Apurva Kulkarni

शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांच्या 'मुंज्या' चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. अवघ्या काही दिवसात या चित्रपटाने १०० कोटींच्यावर कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी इतकं डोक्यावर घेतलं की, कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'सारखा चित्रपट ही 'मुंज्या'ला टक्कर देऊ शकला नाही. दरम्यान 'मुंज्या' चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉमवर लवकरच प्रदर्शित होणार आहे.

शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांच्या 'मुंज्या' चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती मिळाली आहे. कमी बजेटमध्ये बनवलेल्या हॉरर-कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आहे. आता 'मुंज्या' ओटीटी प्लॅटफॉमवर रिलीज होणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

कधी आणि केव्हा प्रदर्शित होणार 'मुंज्या'?

'मुंज्या'मध्ये शर्वरी वाघ हिची महत्तपूर्ण भूमिका पहायला मिळाली आहे. तसंच अभय वर्मा याचा दमदार अभिनयही पहायला मिळाला आहे. चित्रपटात ब्रह्मराक्षस 'मुज्या'ची कथा मांडण्यात आली आहे. थिएटर्समध्ये हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पैसा वसूल ठरला. त्यात आता 'मुंज्या' ओटीटी प्लॅटफॉमवर येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. एका रिपोर्टनुसार 'मुंज्या' चित्रपट लवकर Disney+ Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

बॉक्स ऑफिसवर सुपरहिट

'मुंज्या' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सुरुवात कमी झाली असली तर नंतर चित्रपटाला प्रेक्षकांची डोक्यावर घेतले. 15-20 दिवसांमध्ये 'मुंज्या' चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा पार केला. तसंच महिन्याभरात चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला पार केला. त्यामुळे 2024 मध्ये 'मुंज्या' चित्रपट सुपरहिट चित्रपट ठरला.

'मुंज्या' चित्रपटात ब्रह्मराक्षसाची गोष्ट

चित्रपटात 'मुंज्या' नावाच्या ब्रह्मराक्षसाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील संपुर्ण सेट कोकणातील आहे. एक ब्राह्मण मुलगा त्याची मुंज विधी झाल्यानंतर आठ दिवसाच्या आत त्याचा मृत्यू होतो, आणि त्याचा लग्नाच्या अपुऱ्या इच्छामुळे तो ब्रह्मराक्षस बनतो. पुढे इच्छा पूर्ण करण्यासाठी तो अनेकांना कसा त्रास देतो हे विनोदी पद्धतीनं या चित्रपटात मांडण्यात आले आहे.

'मुंज्या' चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंह यांचा चित्रपटात उत्तम अभिनय आहे. चित्रपटातील ब्रह्मराक्षसाची गोष्ट प्रेक्षकांना अधिक भावली आहे. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉमवर हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो याची आतुरता आता प्रेक्षकांना लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT