Traffic Police Gave Answer SRK Saam TV
मनोरंजन बातम्या

Traffic Police's Reply To SRK: शाहरुखला ३१ वर्षांपूर्वीच्या ‘दिवाना’ची आठवण, मुंबई पोलिसांचंही किंग खानला मजेशीर उत्तर

Chetan Bodke

SRK Response To Fan’s Question Impresses Mumbai Police: अभिनेता किंग खान साठी २०२३ हे वर्ष खूपच खास आहे. या वर्षी किंग खानला अभिनय क्षेत्रात पदार्पण करून ३१ वर्ष पूर्ण झाले आहेत. तो गेल्या काही #AskSRK या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. शाहरूखला बॉलिवूडमध्ये डेब्यू करून ३१ वर्ष पूर्ण झाल्याने त्याने #AskSRK या सेशनमध्ये चाहत्यांसोबच ३१ मिनिट संवाद साधला.

नेहमीप्रमाणे चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्याने दिलखुलास उत्तर देत आजवरच्या प्रवासासंबंधित माहिती दिली. शाहरूखला यावेळी त्याच्या आजवरच्या प्रवासासंबंधित देखील काही प्रश्न विचारले. शाहरुखचा ३१ वर्षपूर्वीचा ‘दिवाना’ चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडिओ ट्वीट करून प्रश्न विचारलाय. याच व्हिडिओची दखल मुंबई वाहतूक पोलिसांनी घेत यावर मजेशीर प्रतिक्रिया दिलीय.

एका युजरने शाहरूखचा १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिवाना’ तील ‘कोई न कोई चाहिए प्यार करने वाला’ या गाण्यातील एक शॉर्ट व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शाहरूख चित्रपटात विनाहेल्मेट रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्या गाण्याविषयी एका युजरने शाहरूखला प्रश्न विचारला, “सर तुमची ही एपिक एंट्री पाहून तुम्हाला कसं वाटतं? चित्रपटाला यावर्षी ३१ वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी आजही ते गाणं पाहून आम्हाला खूप भारी वाटतं.”

चाहत्याच्या या प्रश्नावर शाहरूख म्हणतो, “खूपच छान मला आता कळाले,‘दिवाना’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन ३१ वर्ष पूर्ण झाली आहेत. माझा इथपर्यंतचा प्रवास खरच खूप छान होता. थँक्यू सर्वांना, आपण ३१ मिनिट संवाद साधला.” नंतर पुढे त्याच ट्वीटला रिट्वीट करत शाहरूख म्हणतो, “मी त्यावेळी हेल्मेट घालायला हवे होते.”

हेल्मेट विषयी ट्वीट केलेल्या ट्वीटची आता मुंबई पोलिसांनी देखील दखल घेतली. मुंबई पोलिसांनी ट्वीट केले की, “स्वदेश असो किंवा परदेश, सेफ्टीचा बादशाह #हेल्मटहेना.” मुंबई पोलिसांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून मुंबई पोलिसांचं हे ट्वीट चर्चेचा विषय ठरला.

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, २०२४मध्ये पुन्हा सिद्धार्थ आनंदसोबत काम करायला शाहरुख खान सज्ज आहे. 'टायगर' आणि 'पठान'नंतर आता शाहरुखचा नवीन ॲक्शन थ्रिलर चित्रपट २०२४मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT