Rhea Chakraborty React On Trollers : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर काय काय सोसलं? रिया चक्रवर्तीनं एकेक गोष्ट सांगितली...

Rhea Chakraborty : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती सगळ्यांच्याच निशाणावर होती.
Rhea Chakraborty opens up about toxic comments
Rhea Chakraborty opens up about toxic commentsInstagram @rhea_chakraborty
Published On

Rhea Chakraborty opens up about toxic comments : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या एमटीव्हीच्या रोडीज रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. शो दरम्यान, सुशांत सिंग राजपूतचे नाव न घेता, तिने तिचे आयुष्य कसे बदलले आणि तिला काय यातना भोगाव्या लागल्या हे सांगितले आहे.

रोडीजच्या एका एपिसोडमध्ये, शुली नाडर नावाच्या स्पर्धकाने तिच्या रंगामुळे तिला होणाऱ्या भेदभावाबद्दल सांगितले. यादरम्यान रियाने तिचा अनुभवही शेअर केला.

रिया चक्रवर्ती म्हणाली की, अनेक लोक अनेक गोष्टी बोलतात. लोकांनी मलाही अनेक गोष्टी ऐकवल्या आहेत. रिया म्हणाली, “लोकांनी मला नको नको ती नावे दिली, माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. पण त्यांच्यामुळे मी ती गोष्ट स्वीकारणार का? त्यांच्यामुळे मी माझ्या आयुष्यात थांबू का? अजिबात नाही."

Rhea Chakraborty opens up about toxic comments
Famous Director Death : पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच घेतला अखेरचा श्वास ; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे वयाचे ४२ व्या वर्षी निधन

यादरम्यान रिया चक्रवर्तीने स्पर्धकांना स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगितले आणि इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका. “मी लोकांच्या बोलण्याला महत्त्व देऊ का? नाही. माझ्या मनाचा आवाज ऐकणार. तुम्ही फक्त तुमचा आवाज ऐकला पाहिजे आणि बाकीच्यांकडे दुर्लक्ष करा. ते कोण आहेत बोलणारे?

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती सगळ्यांच्याच निशाणावर होती. सोशल मीडियावर त्याच्याविरोधात बरेच काही बोलले आणि लिहिले गेले. ड्रग्ज प्रकरणात तिला बराच काळ टार्गेट करण्यात आले होते. सुशांतला ड्रग्ज देण्यापासून ते मनी लाँड्रिंग आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्यापर्यंतचे आरोप तिच्यावर आहेत. या सगळ्या प्रकरणात रियाला अटक देखील करण्यात आली होती.

रियाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर, ती शेवटची 2021 मध्ये अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी स्टारर चेहरे या चित्रपटात दिसली होती. यात क्रिस्टल जिसोझा, सिद्धांत कपूर आणि अनु कपूर सारखे स्टार्सही होते. रिया रोडीज पहिल्यांदाच जज करत आहे. यात सोनू सूद, गौतम गुलाटी आणि प्रिन्स नरुला हे देखील टीम लीडरच्या भुमिकेत आहेत. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com